esakal | अमित शहांमुळे पुदुच्चेरीत मोठा राजकीय भूकंप; रंगास्वामींनी सोडली कमळाची साथ

बोलून बातमी शोधा

Amit_Shah_N_Rangaswamy}

भाजपनंतर दुय्यम भूमिका स्वीकारण्यास रंगासास्वा यांची तयारी नाही. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला.

अमित शहांमुळे पुदुच्चेरीत मोठा राजकीय भूकंप; रंगास्वामींनी सोडली कमळाची साथ
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

चेन्नई : पुदुच्चेरीत राजकीय नाट्य घडले असून काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केलेल्या एन. रंगास्वामी यांनी कमळाची साथ सोडली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशात नवे राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता आहे.

70 नाही तर 107 एकर जागेवर उभे राहणार भव्य राम मंदिर; ट्रस्टने खरेदी केली जमीन​

माजी मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी अखिल भारतीय एन. रंगास्वामी काँग्रेस असा स्वतःच्या नावाचा पक्ष स्थापन केला आहे. व्ही. नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार नुकतेच पडले. त्यानंतर राजकीय पुनरागमन करण्यासाठी रंगासास्वा प्रयत्नशील आहेत, मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका विधानामुळे ते नाराज झाले. कराईकल येथे रविवारी प्रचारसभेत शहा यांनी पुदुच्चेरीत भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

बेरोजगार तरुणांसाठी सरकारचं 'सक्षम' पाऊल; पोर्टलमधून मिळणार १० लाखांना रोजगार

भाजपनंतर दुय्यम भूमिका स्वीकारण्यास रंगासास्वा यांची तयारी नाही. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. तमिळनाडूत भाजप आणि अण्णाद्रमुक हे पक्ष एक झाले आहेत. पुदुच्चेरीत हेच घडण्याची अपेक्षा आहे. अशावेळी रंगासास्वा यांच्यासमोर द्रमुकची साथ घेणे किंवा स्वबळावर लढणे, असे दोनच पर्याय शिल्लक आहेत.

जान्हवीचा 'रिमेक' ठरला हिट; सोशल मीडियावरं गाण व्हायरल​

द्रमुक पक्षाकडे लक्ष
द्रमुक नेते एस. जगतरक्षकन यांनी आपला पक्ष पुदुच्चेरीत सत्ता पटकावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल असे म्हटले आहे. त्यामुळे हा पक्ष काँग्रेसशी युती कायम ठेवणार की एन.आर.काँग्रेसबरोबर सशर्त आघाडी करणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. सध्या काँग्रेसची कोंडी झाली आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)