esakal | जान्हवीचा 'रिमेक' ठरला हिट; सोशल मीडियावरं गाण व्हायरल 
sakal

बोलून बातमी शोधा

janhvi kapoor

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा रूही चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटात जान्हवीसोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार राजकूमार राव आणि वरूण शर्मा दिसणार आहे

जान्हवीचा 'रिमेक' ठरला हिट; सोशल मीडियावरं गाण व्हायरल 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा रूही चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटात जान्हवीसोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार राजकूमार राव आणि वरूण शर्मा दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमधील जान्हवी, राजकुमार आणि वरूणचा ट्रायो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या चित्रपटाची आत्तापर्यंत दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. 

नुकतेच या चित्रपटातील 'नदीयों पार' हे गाणं प्रदर्शित झाले आहे. हे गाणे रिमेक आहे. 2004 मध्ये शामूर ग्रुपचे 'लेट्स द म्युजिक प्ले'हे गाणे तेव्हा फार गाजले होते. आजही हे गाणे पार्टीमध्ये लागलेले ऐकायला मिळते. याच गाण्याचा रिमेक 'नदीयों पार' हे रूही मधील गाणे आहे. क्रिस बार्बोसा आणि इ.ड. चिसोल्म यांनी या गाण्याचे इंग्रजी व्हर्जन लिहिले आहे. या गाण्याचं हिंदी व्हर्जन सचिन-जिगर यांनी गायलं आहे. रूही चित्रपटातील या गाण्याच्या रिमेकला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. हे गाणे यूट्युबवर प्रदर्शित झाले असून सध्या इंटरनेटवर जान्हवीचं हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे.

जयललितांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या शशीकला आहेत तरी कोण?

'नदियों पार' या गाण्यात जाह्नवी गोल्डन ड्रेसमध्ये खूप हॉट दिसत आहे.या गाण्याला युट्युबवर 1 कोटीपेक्षा जास्त व्हिव मिळाले आहेत. या गाण्यामध्ये जान्हवी गोल्डन ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.या गाण्याआधी बॉलिवूडमधील इतर रिमेक गाण्यांना प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नव्हती. पण या गाण्याने रिमेक गाण्याच्या यादीमध्ये वरचे स्थान मिळवले आहे. 

loading image