यादव कुटुंबाचा वाद खोटा- भाजप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

नवी दिल्ली- समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात कोणासोबतही युती केली तरी ते जिंकू शकत नाहीत, उत्तर प्रदेशात भाजपच बहुमत मिळवेल. तसेच यादव कुटुंबातील वाद खोटा आहे असा आरोपही भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी केला. 

शाहनवाज म्हणाले, "काँग्रेसची एकही मत मिळवण्याची ताकद नसताना समाजवादी पक्षाने त्यांच्यासोबत युती केली आहे. या युतीने आमच्यावर काहीही फरक पडणार नाही व भारतीय जनता पक्ष या युतीचा धुव्वा उडवून बहुमतापर्यंत जाईल."

मुलायमसिंह, शिवपालसिंह आणि अखिलेश यादव त्यांच्यात वाद आहे, असे भासवून मागील पाच वर्षातील त्यांचे गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. यादव कुटुंब एकत्रच आहे व त्यांच्यातील वाद खोटा आहे. गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षाने गुन्हे आणि गुन्हेगारांना प्रोत्साहनच दिले आहे. यादव कुटुंबातील कलह लोकांना त्यांच्या काळात झालेल्या गुन्हे आणि घोटाळ्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप शाहनवाज हुसेन यांनी केला.   

काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांनी 17 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस- समाजवादी पक्षाची युती होणार असल्याची घोषणा केली होती. 
 
Web Title: dispute in yadav family is drama