esakal | हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याविरूद्ध प्रदेश भाजपमध्ये नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

Jairam Thakur

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याविरूद्ध प्रदेश भाजपमध्ये नाराजी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतले आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता भाजप पक्षश्रेष्ठी हिमाचलमध्ये नेतृत्वबदल करू शकते, अशी माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ गोवा व त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनाही ‘नंबर’ लागू शकतो अशीही चर्चा आहे.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याविरूद्ध प्रदेश भाजपमध्ये नाराजी तीव्र आहे. राज्यात भाजपने नुकतीच जी आशीर्वाद यात्रा काढली त्यापासून मुख्यमंत्र्यांना दूर ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. नाराजीची ही धग दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात असंतुष्ट भाजप नेत्यांना यश आले आहे.

हेही वाचा: कोर्ट मार्शल : लैंगिक अत्याचार प्रकरणी जवानाला ५ वर्षांची शिक्षा

आपल्या धाकट्या भावाला या राज्यात वरचे पद मिळविण्यासाठी आसुसलेल्या एका केंद्रीय मंत्र्यांनी ठाकूर यांच्या विरुद्धच्या नाराजीच्या आगीत तेल ओतल्याचीही माहिती आहे. ठाकूर गेल्या रविवारी दिल्लीत होते. ते सिमला येथे परतल्यावर दोन दिवसांतच त्यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा दिल्लीत बोलावून घेणे हे ठाकूर यांच्या ‘खुर्ची’साठी गंभीर लक्षण मानले जाते. मुख्यमंत्री ठाकूर यांच्यासह राज्य प्रभारी अविनाश राय खन्ना, संजय टंडन, संघटन मंत्री पवन राणा व भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनाही दिल्लीत बोलावून घेण्यात आले आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा या सर्वांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ठाकूर यांच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय अमित शहा यांच्या दरबारी घेतला जाऊ शकतो. हा काळ जास्तीत जास्त २-३ दिवसांचा असेल असे भाजप सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसकडून टीका सुरू

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे पद जाणारच, असा प्रचार काँग्रेसने हिमाचल प्रदेशात सुरू केला आहे. यापूर्वी उत्तराखंड, कर्नाटक या राज्यांचे जे मुख्यमंत्री भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने हटविले त्यांच्याबरोबरच्या दिल्लीत अशाच प्रकारच्या बैठकी झाल्या होत्या. त्यावेळीही संघटनात्मक चर्चेसाठी ते दिल्लीत आल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात त्या मुख्यमंत्र्यांना तातडीने नारळ मिळाला आहे.

loading image
go to top