भ्रष्टाचाराच्या बाजूने समाजात एक वर्ग - नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - 'भ्रष्टाचार व काळा पैसा यांच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचा छोटा का होईना, एक वर्ग समाजात तयार झाला आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीवरून संसद कामकाज रोखून धरणाऱ्या विरोधी पक्षांवर आणखी एक प्रहार केला आहे.

जनसंघ व भाजपचे नेते दिवंगत केदारनाथ सहानी यांच्यावरील गौरवग्रंथाचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत झाले. संसद ग्रंथालय भवनातील जीएमसी बालयोगी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संघटनमंत्री रामलाल व भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

सहानी, विजयकुमार मल्होत्रा व मदनलाल खुराणा या दिल्ली भाजपच्या एकेकाळच्या त्रिकुटाच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मोदी यांनी या वेळी बोलताना नोटाबंदीला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर त्यांचा नामोल्लेख न करता जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी सांगितले की, मूल्यांचे अधःपतन कोणत्याही देशावरील सर्वांत मोठे संकट असते. सहानी ज्या उच्च जीवनमूल्यांसाठी आयुष्यभर कार्यरत राहिले, त्यांचा आज सर्वाधिक ऱ्हास होतो आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. परीक्षांतील कॉपी करण्याच्या पद्धतीतील बदलांचे उदाहरण देऊन मोदी म्हणाले, भविष्याचा व भावी पिढ्यांचा विचार करता "तडजोड' संस्कृतीशी लढाई करण्याची तयारी आपल्या सर्वांना ठेवावी लागणार आहे. वाईट गोष्टींची, अमंगलाची बाजू घेणारे लोक हे समाजासमोरचे मोठे संकट असते. या संकटाविरुद्ध सर्वांनी समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. एके काळी भ्रष्टाचार लपूनछपून व्हायचा. मात्र, आज काही लोक भ्रष्टाचारावर व काळ्या पैशावर उघडउघड भाषणे देऊ लागले आहेत. त्याची बाजू घेऊ लागले आहेत. हा वर्ग छोटा असला तरी, तो निर्माण होणे हीच समाजासमोरील भावी गंभीर संकटाची नांदी आहे, अशीही भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

Web Title: A division of society along with corruption