नवी दिल्ली : घटस्फोटानंतर कायमस्वरुपी पोटगी ही पतीसाठी दंडात्मक असू नये, पण पत्नीच्या जीवनमानाची योग्य ती काळजी त्यानं घेतली पाहिजे, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे. यामध्ये कुठल्या घटकांचा समावेश असावा याची यादीच कोर्टानं यावेळी जाहीर केली. .Supreme Court: ''धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही'', पश्चिम बंगालच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी.मंगळवारी एका खटल्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं पतीला आदेश दिला की त्यानं पत्नीला वन टाइम सेटलमेंट म्हणून ५ कोटी रुपयांची पोटगी द्यावी. न्या. विक्रमनाथ आणि न्या. प्रसन्न बी. वराळे यांच्या खंडपीठानं हे निर्देश देताना आपल्या मुलाची देखभाल आणि संगोपन करण्याच्या वडिलांच्या दायित्वावर भर दिला तसंच पतीला १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश दिले..Supreme Court : आरक्षणासाठी धर्मांतर हा राज्यघटनेला धोका, नोकरीसाठी धर्मात बदल अमान्य; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.अपीलकर्ता (पती) आणि प्रतिवादी (पत्नी) लग्नाच्या सहा वर्षानंतर सुमारे दोन दशकं वेगळे राहत होते. पत्नी खूपच संवेदनशील व्यक्ती असल्याचा आरोप पतीनं केला होता आणि आपल्या कुटुंबाशी जुळवून घेत नसल्याचा आरोप केला होता. तर पत्नीनं पतीवर आरोप केला होता की, तोच आपल्याशी व्यवस्थित वागत नाही. पण दोन्ही पक्ष दीर्घकाळापासून वेगळे राहत असल्यानं तसंच त्यांच्यात पुन्हा वैवाहिक बंधनात सामील होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्यानं कोर्टानं त्यांचा विवाह पुन्हा जुळू शकत नसल्याचं मान्य केलं..Supreme Court : मोफत अन्नधान्य किती दिवस वाटणार? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा.दरम्यान, हिंदू विवाह कायद्यांतर्गत अधिकारक्षेत्र किंवा अंतरिम देखभाल यासंबंधी इतर काही मुद्दे घटस्फोटावेळी उपस्थित होत असतात. तरी पत्नीला कायमस्वरूपी पोटगी देणं हेच योग्य असल्याचं मत यावेळी कोर्टानं नोंदवलं. तसंच कायमस्वरूपी पोटगीची रक्कम ठरवताना कोणत्या घटकांचा विचार करणं आवश्यक आहे, याची एक यादी सांगताना कोर्टानं रजनीश विरुद्ध नेहा (2021) आणि किरण ज्योत मैनी विरुद्ध अनिश प्रमोद पटेल (2024) प्रकरणांचा संदर्भ दिला..Stock Market Closing: भारतीय शेअर बाजार सुस्त; निफ्टी 24,630 अंकांवर बंद, बँकिंग शेअर्सवर दबाव.कायमस्वरूपी पोटगीच्या रकमेचा निर्णय घेताना कोर्टाला पुढील बाबी आवश्यक वाटतात पती आणि पत्नी या दोघांची सामाजिक आर्थिक स्थिती कशी आहे.पत्नी आणि अवलंबून असलेल्या मुलांच्या वाजवी गरजा काय आहेत. पती आणि पत्नी यांची वैयक्तिक पात्रता आणि रोजगाराची स्थिती काय? स्वतंत्र उत्पन्न किंवा मालमत्ता किती?वैवाहिक घरात पत्नीनं उपभोगलेलं जीवनमान कसं? कौटुंबक जबाबदाऱ्यांसाठी केलेला कोणत्याही रोजगार त्यागकाम न करणाऱ्या पत्नीसाठी वाजवी खटल्याचा खर्च.पतीची आर्थिक क्षमता, त्याचे उत्पन्न, पोटगीची जबाबदारी आणि जबाबदारी.VIDEO : असं कसं रे भाऊ...? चक्क ॲनाकोंडाच्या कुशीत पुस्तक वाचतोय पठ्ठ्या पायाशी लोळतोय श्वान, व्हिडीओ व्हायरल .कोर्टानं घटकांची ही यादी जाहीर करताना म्हटलं की सरसकट हा फॉर्म्युला लागू होणार नाही पण कायमस्वरूपी पोटगीचा निर्णय घेताना मार्गदर्शक तत्त्व म्हणून कार्य करु शकतात. कायमस्वरूपी पोटगीची रक्कम पतीला दंडात्मक राहणार नाही तर पत्नीचं जीवनमान चांगलं राहील अशा पद्धतीनं ठरवलं जावं, असं कोर्टानं यावेळी नमूद केलं..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.