Diwali 2022: दिवाळीत फटाके फोडता येणार की नाही? प्रत्येक राज्यात असणार नियम आणि वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali 2022

Diwali 2022: दिवाळीत फटाके फोडता येणार की नाही? प्रत्येक राज्यात असणार नियम आणि वेळ

Guidelines: दिवाळी हा आनंदोत्सवाचा सण असला तरी या सणात फटाके फोडण्याबाबत योग्य ती काळजी घेणे फार महत्वाचे ठरते. फटाक्यांमुळे देशभऱ्यात दरवर्षी दूर्घटना होत असतात. त्या टाळण्यासाठी आता प्रशासनाने राज्यानुसार नियमावली जारी केली आहे. तेव्हा तुमच्या राज्यात फटाके फोडण्याबाबत काय नियम आहे ते जाणून घ्या.

दिल्ली - दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि मॅन्यूफॅक्चरिंगवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. फटाके फोडल्यास ६ महिने कारावास आणि दोनशे रुपये दंड भरावा लागू शकतो. तर फटाके बनवणाऱ्या किंवा विकणाऱ्याला ३ वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. (Diwali)

पंजाब- पंजाबमध्ये रात्री ८ ते १० पर्यंत फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वेळेत लोकांना फक्त ग्रीन फटाके फोडता येणार आहे. पर्यावरण मंत्री गुरमित सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रीन फटाक्याव्यतिरिक्त इतर फटाके फोडण्यावर बंदी घातल्या गेलीय.

हरियाणा- या राज्यातही ग्रीन फटाके सोडता इतर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी आदेशानुसार बाकी फटाक्यांमधूर विषारी वायू बाहेर पडतो. अशा फटाक्यांवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल- या राज्यातही ग्रीन फटाक्यांव्यतिरिक्त इतर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. काली पूजा आणि दिवाळीच्या दिवशी ७ ते ८ मात्र फटाके फोडण्याची संमती देण्यात आली आहे. तर छट पूजेच्या दिवशी ६ ते ८ फटाके फोडता येणार आहे.

हेही वाचा: Diwali Alert: दिवाळीच्या दिवसांत 'या' गोष्टींची आवर्जून घ्या का काळजी, अन्यथा जीवाला धोका

तामिळनाडू - या राज्यात मागल्या चार वर्षापासून फटाके फोडण्यासाठी दोन तासाचा अवधी दिला जातो. सकाळी ६ ते ७ आणि रात्री ७ ते ८ या राज्यात फटाके फोडता येतील. हा वेळ फटाके फोडण्यासाठी निश्चित करण्यात आलाय.