DK Shivakumar : शिवकुमार यांना दिलासा! CBI चौकशीची स्थगिती उठविण्यास SCचा नकार

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023esakal

नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कर्नटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला आहे. सीबीआय तपासावरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Karnataka Assembly Election 2023
Jaipur-Mumbai Exp Firing: "फक्त मोदी अन् योगीच..", एक्सप्रेसमध्ये गोळीबार केल्यावर कॉन्स्टेबलने घेतले ठाकरेंचेही नाव, Video Viral

कर्नटक उच्च न्यायालयाच्या मेरीटनुसार सुनावणी सुरू राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या १० फेब्रुवारीच्या आदेशाविरोधात सीबीआयचे अपील फेटाळून लावले.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, सीबीआयच्या बाजूने आदेश असतानाही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तपासाला अंतरिम स्थगिती दिली आहे. शिवकुमार यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी म्हणाले की, सीबीआयने उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात अपील दाखल केले आहे, परंतु नंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशांना आव्हान देण्यास नकार दिला.

Karnataka Assembly Election 2023
Lokmanya Tilak Punyatithi : लोकमान्यांच्या अंत्ययात्रेला महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी दिला होता खांदा...

त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले आणि सीबीआयला हे प्रकरण जलद गतीने निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात विनंती करण्यास परवानगी दिली.

कर्नाटक उच्च न्यायालयाने शिवकुमार यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयच्या कारवाईला १० फेब्रुवारी रोजी स्थगिती दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले होते. ही प्रकरणे २०२० सालची असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. तसेच मागील दोन वर्षांतील तपासाच्या प्रगतीची माहितीही न्यायालयाने सीबीआयकडे मागितली होती. अंतिम अहवाल कधी सादर करणार, अशी विचारणा न्यायालयाने एजन्सीला केली होती. उच्च न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत सुनावणी तहकूब केली होती.

आयकर विभागाने २०१७ मध्ये शिवकुमार यांच्या घरावर छापे टाकले होते. विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरोधात चौकशीही सुरू केली होती. ईडीच्या चौकशीच्या आधारे सीबीआयने कर्नाटक सरकारकडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची परवानगी मागितली होती.

२५ सप्टेंबर २०१९ रोजी परवानगी देण्यात आली आणि ३ ऑक्टोबर २०२० रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. शिवकुमार यांनी एफआयआरला उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com