Senthil kumar: इंडिया आघाडी बॅकफूटवर! 'गौ-मूत्र' वक्तव्यावरुन सेंथिल कुमारांची संसदेत माफी

डीएमकेचे खासदार एस सेंथिल कुमार यांनी हिंदी भाषिक राज्यांना 'गोमूत्र बेल्ट' म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता याप्रकरणी एस सेंथिल कुमार यांनी बुधवारी संसदेत बोलताना माफी मागितली आहे.
Senthil kumar
Senthil kumar

नवी दिल्ली- डीएमकेचे खासदार एस सेंथिल कुमार यांनी हिंदी भाषिक राज्यांना 'गोमूत्र बेल्ट' म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता याप्रकरणी एस सेंथिल कुमार यांनी बुधवारी संसदेत बोलताना माफी मागितली आहे. आपल्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं ते म्हणाले आहेत. (DMK MP D N V Senthilkumar apologises controversy BJP wins elections only in Gau Mutra states)

संसदेचे कामसुरु झाल्यानंतर सभागृहात मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यात आला. भाजप खासदारांनी आक्रमक होत सेंथिल कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की, त्याचं वक्तव्य देश आणि सनातन विरोधात आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी. त्यानंतर संसदेचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

Senthil kumar
Senthil Kumar: "भाजप फक्त 'गौ मुत्र' राज्यांमध्येच जिंकतो"; DMK खासदाराच्या विधानामुळं नवा वाद

दुपारी १२ नंतर संसद सुरु झाल्यानंतर सेंथिल कुमार यांनी माफी मागितली. ते म्हणाले की, 'मी माझ्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे वक्तव्य परत घेतो. संसदेच्या कार्यवाहीतून देखील हे वक्तव्य हटवण्यात यावे.' यावर सभापती ओम प्रकाश बिर्ला म्हणाले की, याआधीच वक्तव्य पटलावरुन हटवण्यात आलं आहे. तुम्ही माफी मागितली आहे. ते ठीक झालं.

सेंथिल कुमार यांच्या वक्तव्यामुळे दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असा मुद्दा पेटवण्यात आला होता. भाजपने या मुद्द्यावरुन काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा हा अपमान असल्याचं भाजपनं म्हटलं होतं. सेंथिल कुमार यांनी उत्तरेतील तीन राज्यात भाजपचा विजय झाल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. या राज्यांना त्यांनी गौमूत्र राज्य म्हटलं होतं.

Senthil kumar
Maharashtra Politics: गळाभेट घेत थोपटली बहिणीची पाठ; राजकीय वर्तुळात वाद मिटल्याच्या चर्चा, मुंडे भावाबहिणीचा फोटो व्हायरल

काँग्रेसने दक्षिणेतील तेलंणगा राज्य काबिज केलं आहे. तर, भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विजय मिळाला. उत्तर भारतात काँग्रेसची फक्त हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता आहे. दक्षिणेमध्ये काँग्रेस कर्नाटक आणि तेलंगणात सत्तेमध्ये आहे. दरम्यान, सेंथिल कुमार यांचं वक्तव्य इंडिया आघाडीसाठी अडचणीचं ठरु लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या माफीनंतर तरी हा वाद मिटतो का हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com