
हिंदी भाषेवरील वादग्रस्त विधानानंतर DMK च्या खासदाराचे स्पष्टीकरण
द्रमुकचे खासदार टीकेएस एलांगोवन (TKS Elangovan) यांनी हिंदी ही अविकसित राज्यांची भाषा असल्याचे सांगत हिंदी ही केवळ शूद्रांसाठी असल्याचे विधान केल्याने नविन वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (DMK MP TKS Elangovan gives explanation on his earlier remarks on the Hindi language)
ते म्हणाले की, मी 'शूद्र' हा शब्द वापरला नाही. तामिळ हा एक समान समाज आहे आणि दक्षिणेत वर्गभेद पाळला जात नाही. उत्तरेकडून आलेल्या भाषेमुळे आपल्यामध्येही फूट पाडली आहे. द्रविड चळवळीतील लोक शूद्र, ओबीसी यांच्या शिक्षण हक्कांसाठी लढले, असे टीकेएस एलांगोवन म्हणाले आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, 'मी म्हणालो की हिंदीचा प्रवेश झाल्याने उत्तरेकडून लादण्यात आलेल्या सांस्कृतिक प्रथा आपल्याकडे येऊ शकतात. त्यामुळे आपण शूद्र वर्गातील ठरू, असे मला म्हणायचे होते', असे डीएमकेचे खासदार म्हणाले आहेत.
हेही वाचा: आमदारांच्या बैठकीआधीच नितीन नांदगावकरांवर मोठी जबाबदारी; शिवसेनेची खेळी
खासदार काय म्हणाले होते?
हिंदी ही केवळ शूद्रांसाठी असल्याचे विधान करत त्यांनी कथित जातीयवादी टिप्पणीही केली. त्यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. ते म्हणाल की, "हिंदी ही केवळ बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान सारख्या अविकसित राज्यांमध्ये मातृभाषा आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब पहा. ही सर्व विकसित राज्ये नाहीत का? हिंदी ही या राज्यांतील लोकांची मातृभाषा नसल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा: जम्मू येथे वासुकी नाग मंदिराची तोडफोड, नागरिकांकडून निषेध
दरम्यान एप्रिलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा स्वीकारली जावी, स्थानिक भाषा नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता हिंदी आपल्याला क्षुद्र बनवू शकते. तसेच हिंदी आपल्यासाठी चांगली नाही, असे विधान टीकेएस एलांगोवन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता देशात नव्या वादाला तोंड फुटणार आहे.
Web Title: Dmk Mp Tks Elangovan Gives Explanation On His Earlier Remarks On The Hindi Language
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..