

DMK's Shift on Delimitation Bill May Reshape Lok Sabha Numbers
esakal
Delimitation Bill: लोकसभेत घटनादुरुस्तीशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमतापासून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) अद्याप दूर असल्याने विरोधी पक्षांतील काही खासदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. विशेषतः तामिळनाडूतील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) पक्षाची भूमिका बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.