केंद्र सरकारच्या नैतिकतेवर विश्वास नाही - प्रियंका गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi
केंद्र सरकारच्या नैतिकतेवर विश्वास नाही - प्रियंका गांधी

केंद्र सरकारच्या नैतिकतेवर विश्वास नाही - प्रियंका गांधी

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. त्यानंतर देशभरातून या निर्णयावर प्रतिक्रीया येत आहेत. आगामी काळात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.

हेही वाचा: काय होते 3 कृषी कायदे आणि आक्षेप? जाणून घ्या सविस्तर

सरकार शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, गुंडे, देशद्रोही म्हणत होते, शेतकऱ्यांच्या हत्या होत होत्या, त्यांना अटक केली जात होती, ते कुणी केलं..तुमच्याच सरकारने केलं. त्यामुळे आपल्यावर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी केला आहे. शेतकऱ्यांसमोर सरकारला झुकावं लागलं आहे, मात्र सरकारच्या नैतिकतेवर आम्ही विश्वास ठेऊ शकत नाही अशा भावना यावेळी प्रियंका गांधी यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कोण काय म्हणाले? | Farm Law Repeal

शेतकरी आज वेगवेगळ्या अडचणींचा सामना करतोय, त्यांच्या समस्या समजून, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं देखील त्या यावेळी म्हणाल्या. आता पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली, सर्व विरोधी पक्षांनी समर्थन दिलं असं म्हणत त्यांनी या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना वंदन केलं.

loading image
go to top