डोकलामसारखी घटना पुन्हा नको : चीन 

पीटीआय
मंगळवार, 19 जून 2018

डोकलामचा वाद मागे सोडून चीन आता भारताच्या साथीत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. आणखी एका डोकलामचा ताण भारत आणि चीनला परवडणारा नाही. त्यामुळे डोकलामसारखी आणखी कोणती घटना घडू नये, असे दोन्ही देशांना वाटते.

नवी दिल्ली: डोकलामचा वाद मागे सोडून चीन आता भारताच्या साथीत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. आणखी एका डोकलामचा ताण भारत आणि चीनला परवडणारा नाही. त्यामुळे डोकलामसारखी आणखी कोणती घटना घडू नये, असे दोन्ही देशांना वाटते.

सीमेवर अशी परिस्थिती पुन्हा निर्माण व्हावी अशी आमची इच्छा नाही. सीमेवर शांतता कायम राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया, असे भारतातील चीनचे राजदूत ल्यू झाओहुई भारत आणि चीनमधील संबंधावर आयोजित कार्यक्रमात म्हणाले. डोकलाम सीमा वादादरम्यान भारत आणि चीनचे लष्कर आमने सामने आले होते. सुमारे 72 दिवस डोकलाम सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य तैनात होते.

Web Title: Do not repeat like doklam issue says China