esakal | प्लाझ्मा थेरपीचा अमर्याद वापर नको
sakal

बोलून बातमी शोधा

plasma therapy

केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सीपीटी प्लाझ्मा उपचारांच्या अतिरेकाबाबत इशारा देणारे दिशानिर्देश आयसीएमआरने जारी केले. प्लाझ्मा हा केवळ प्रयोग आहे.

प्लाझ्मा थेरपीचा अमर्याद वापर नको

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनाग्रस्त रुग्णांवर केल्या जाणाऱ्या प्लाझ्मा उपचारांचा अंदाधुंद आणि सरसकट वापर करू नये, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आज दिला आहे. याबाबत कोरोना रुग्णालये आणि डॉक्‍टरांसाठी नवे दिशानिर्देशही जारी करण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सीपीटी प्लाझ्मा उपचारांच्या अतिरेकाबाबत इशारा देणारे दिशानिर्देश आयसीएमआरने जारी केले. प्लाझ्मा हा केवळ प्रयोग आहे. त्याचा उपचार म्हणून कोरोना रुग्णांवर वापर करू नये, असा इशारा यापूर्वीही देण्यात आला होता. दिल्लीसह अनेक राज्यांनी कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा उपचारांवर भर दिला आहे. दिल्ली सरकारने प्लाझ्मा बॅंकेचीही स्थापना केली. मात्र आयसीएमआर व केंद्रीय आरोग्य यंत्रणेने प्लाझ्माच्या सरसकट वापराबाबत वांरवार सावधतेचे इशारे दिले. ताज्या दिशानिर्देशांत म्हटले आहे, की श्‍वसनास त्रास होणे व थकवा जाणवण्याची लक्षणे असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा उपचाराचा फायदा मिळतो. मात्र यामुळे मृत्यू रोखता येत नाहीत. देशातील ३९ सरकारी-खासगी रुग्णालयांतील कोरोना रुग्णांवर केलेल्या पीएलएसीआयडी प्लाझ्मा चाचण्यांचे निष्कर्ष असे आहेत, की कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा उपचाराचा उपयोग अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू रोखता येत नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असा देतात प्लाझ्मा 
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरात विषाणूशी लढण्यासाठीच्या प्रतिरोधक पेशी (अँटीबॉडीज) तयार झालेल्या असतात. अशा रुग्णांचे २०० मिलिमीटर रक्त घेऊन त्यातून पिवळसर रंगाचा द्राव (प्लाझ्मा) वेगळा केला जातो व तो कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरला जातो.

loading image