Cyrus Mistry Death: 100 वर्षांपूर्वीच सायरस मिस्त्रींच्या कुटूंबाची झालेली टाटामध्ये एंट्री

वाचा दोन कोटी रुपयांच्या कर्जाची कहानी
 Ratan Tata And Cyrus Mistry
Ratan Tata And Cyrus Mistry sakal

Cyrus Mistry Death: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर सायरस मिस्त्री आणि टाटा यांच्यातील व्यायवसायिक मैत्र पुन्हा नव्याने चर्चेत आली. सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील एक उत्तम व्यावसायिक मैत्रीने कसे उग्र रुप घेतले हे आपण सर्वांनी पाहले. कारण सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील वाद जगापासून कधीच लपले नाही. पण तुम्हाला माहिती आहे का सायरस मिस्त्रीच्या कुटूंबाचा यांचा टाटा ग्रुपमध्ये प्रवेश कसा झाला? हि एक रोमांचक कहानी आहे. (do you know how Cyrus Mistry family get entry in ratan tatas tata group read story)

 Ratan Tata And Cyrus Mistry
Tata Group च्या या शेअर्समध्ये एका वर्षात मिळेल 39 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा

शापूरजी फैमिलीला दोन कोटी रुपयांच्या कर्जाखाली टाटा सन्समध्ये एंट्री मिळाली होती.

असं म्हणतात की 1920 मध्ये टाटा स्टील आणि टाटा हाइड्रो कर्जाच्या ओझ्याखाली असताना यातून सुटका मिळण्यासाठी टाटा संसनी पारसी उद्योगपती फ्रामरोज एडुल्जी दिनशॉ यांच्यांशी संपर्क केला होता. पेशाने वकील आणि मोठे जमीनदार असणारे दिनशॉ यांनी टाटा ग्रुपला 2 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

या बदल्यात त्यांच्या हाती टाटाची 12.5 टक्क्यांची हिस्सेवाटी आली होती. दिनशॉ यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी ती हिस्सेवाटी 1936मध्ये शापूरजी पलोनजी यांना विकली. अशा प्रकारे शापूरजी फैमिलीची टाटा संस मध्ये एंट्री झाली. हेच शापूरजी पलोनजी साइरस मिस्त्री यांचे आजोबा होते. पुढे मिस्त्री यांना 2016 मध्ये रतन टाटा यांच्याशी सुरू असलेल्या मतभेदांमुळे चेयरमन पदावरुन हटवण्यात आले.

 Ratan Tata And Cyrus Mistry
Tata Group च्या 'या' शेअरमध्ये मिळेल 41% रिटर्न, तुमच्याकडे आहे का?

साइरस मिस्त्री यांना 2013 मध्ये टाटा सन्सच्या चेयरमन पद देण्यात आले. हे पहिल्यांदा झाले की टाटा फॅमिलीच्या बाहेरच्या व्यक्तीला ही जबाबदारी देण्यात आली होती. मात्र ब्रिटेनमध्ये टाटा स्टीलच्या व्यापाराला विकण्यावरुन रतन टाटा आणि साइरस मिस्त्री यांच्यात मतभेद निर्माण झाले. यानंतर 2016 मध्ये साइरस मिस्त्री यांना पदावरुन काढण्यात आले. त्यानंतर टाटा संस और शापूरजी पलोनजी ग्रुपमध्ये खुप मोठा वाद रंगला आणि या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com