Children's Day 2023: जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

नेहरूंविषयी या गोष्टी तुम्हालाही माहिती नसतील...
Children's Day
Children's Day sakal

भारतामध्ये दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. भारतात बालदिन साजरा करण्यामागे दोन कारणे आहेत. लहान मुलांचे आवडते चाचा नेहरू आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदाचा मान मिळवणारे पंडित नेहरू यांची आज जयंती.

प्रत्येकाला त्यांच्याविषयी माहिती आहे. मात्र पंडित नेहरूंच्या काही गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्यांच्या वयक्तिक आयुष्यातील या काही गोष्टी वाचून तुम्हीही अवाक व्हाल.

जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहे काय?

त्यांच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला ठाऊक नसतील. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात महत्वाच्या गोष्टी

  • दंगलखोरांशी लढण्यासाठी नेहरूंनी पिस्तूल उगारली होती. हा प्रसंग आहे 1947चा.

  • नेहरू यांचे आजोबा गंगाधर पंडित दिल्लीचे शेवटते कोतवाल होते.

  • स्वातंत्रपूर्वीच्या काळात सगळेच नेते केवळ पांढरा सदरा घालायचे, नेहरू हे पहिले नेते होते ज्यांनी या सदऱ्यावर ‘जॅकेट’ घालायचे. हेच पुढे ‘नेहरू जॅकेट’ म्हणून प्रसिद्धीस पावले.

  • तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की नेहरुंना १९५०-१९५५ या काळात सुमारे ११ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, परंतु त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार कधीही मिळाला नाही.

  • नेहरू हे कश्मिरी पंडित होते. त्यामुळे आपसूकच पंडिती अभ्यासाचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. प्राचीन भारत, वेद, संस्कृत आणि अश्या प्रकारच्या साहित्यांचे त्यांनी अनेक वर्षे अध्ययन केले.

  • सिगरेट पिताना नेहरूंचा फोटो तुम्ही अनेकवेळा पाहिला असेल. त्यांचा सिगरेटचा सर्वात आवडता ब्रॅंड होता ‘555 सिगारेट’.

  • कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच नेहरू मुस्लीम नेत्यांच्या संपर्कात आले होते. शेख अब्दुला १९३७ मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांची मुस्लीम नेत्यांशी जवळीक अधिक वाढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com