पत्नीची हत्या करुन तिला ठेवले 'ऑनलाइन' जिवंत

rakhi
rakhi

गोरखपूर (उत्तर प्रदेश): एका प्रसिद्ध डॉक्टरने पत्नीची उंच कड्यावरून ढकलून हत्या केली. मात्र, या हत्येची कोणाला माहिती मिळू नये म्हणून तो तिचा मोबाईल वापरून ती जिवंत असल्याचे डॉक्टर दाखवत होता. अखेर, तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील प्रसिद्ध सर्जन डॉ. धर्मेंद्र प्रताप सिंह याने नेपाळमध्ये उंच कड्यावरुन ढकलून पत्नी राखी श्रीवास्तव उर्फ राजेश्वरीची हत्या केली होती. मात्र, याबाबातची कोणालाही माहिती मिळू नये यासाठी तो सतत तिचे सोशल मीडिया अकाऊंट वापरत होता. सोशल मीडियावर अपडेट करत पत्नी अद्यापही जिवंत असल्याचे दाखवत होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा असून, डॉक्टर व त्याचे दोन सहकारी प्रमोद कुमार सिंह आणि देशदिपक निशाद यांना अटक करण्यात आली आहे.

राखी गोरखपूरमधून बेपत्ता झाली होती. तिचा भाऊ अमर श्रीवास्तव याने शहापूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान राखी 1 जूनला मनिषसोबत नेपाळला गेली असल्याची माहिती मिळाली. परंतु, मनिष परतला असतानाही ती तिथेच थांबली होती. पोलिसांना डॉ. सिंह याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याचे कॉल डिटेल्स तपासले असता राखी बेपत्ता झाली त्यावेळी तोदेखील नेपाळमध्येच होता अशी माहिती समोर आली. राखीचा दुसरा पती मनिष सिन्हा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. विशेष तपास पथकाने तपास हाती घेतला असता डॉ. सिंह याच्यापर्यंत पोलिस पोहोचले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

डॉ. सिंह याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की, 'राखी पैशांसाठी आणि संपत्तीसाठी ब्लॅकमेल करत होती, यामुळे आपण तिची हत्या केली. माझ्या दोन सहकाऱ्यांनी मनिष भारतात परतल्यानंतर राखीला आपल्यासोबत बाहेर नेले. तिला गुंगींचे औषध दिले आणि पोखरा येथे उंच कड्यावरुन खाली ढकलून दिले. राखीची हत्या केल्यानंतरही मोबाइलवरुन तिचं सोशल मीडिया अपडेट करत होतो.'

दरम्यान, राखीचे मोबाइलचे शेवटचे लोकेशनदेखील 4 ऑक्टोबरला गुवाहाटी दाखवत होते. राखीच्या कुटुंबालाही ती गुवाहाटीत असावी असे वाटत होते. डॉ. सिंह याने चौकशीत आपण आपल्या सहकाऱ्यासोबत मोबाइल गुवाहाटीला पाठवला होता. त्याने तो तिथेच फेकून दिला, अशी माहिती पोलिसांना दिली. आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी कऱण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com