माझ्या मृत्यूला देवच जबाबदार...

वृत्तसंस्था
Thursday, 24 September 2020

'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच जबाबदार असून, पोलिसांनी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये,' अशी चिठ्ठी लिहून डॉक्टरने आत्महत्या केली. पण, नवऱयाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पत्नीने दोन मुलींसह पाण्याच्या टाकीत उडी मारल्याची घटना घडली.

चंदीगड (हरियाणा): 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच जबाबदार असून, पोलिसांनी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये,' अशी चिठ्ठी लिहून डॉक्टरने आत्महत्या केली. पण, नवऱयाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पत्नीने दोन मुलींसह पाण्याच्या टाकीत उडी मारल्याची घटना घडली.

खासगी लॅबमध्ये 30 जण पॉझिटिव्ह; सरकारीमध्ये निगेटिव्ह

रोहतक येथे एका डॉक्टरने विष प्राशन करून आत्महत्या केली. पतीच्या आत्महत्येबाबत माहिती सजमल्यानंतर पत्नीने दोन मुलींसह पाण्याच्या टाकीत उडी घेतली. यात पत्नी व एका मुलीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर एक मुलगी पोहत बाहेर आल्याने तिचा जीव वाचला आहे. डॉक्टर प्रमोद सहारण असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. ते रोहतक येथील हेल्थ युनिव्हर्सिटीच्या नर्सिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. कन्हेली गावाजवळ त्यांनी बुधवारी (ता. 23) सायंकाळी 6 वाजता विष प्राशन करून आत्महत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना डॉक्टरांच्या खिशात विषाच्या पाच पुड्या सापडल्या. शिवाय, त्यांच्या मृतदेहाजवळ आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी मिळाली. पती प्रमोद यांच्या आत्महत्येबाबत माहिती समजल्यानंतर पत्नी मिनाक्षी यांनी दोन्ही मुलींना दुचाकीवर बसवले आणि घराबाहेर पडल्या. यानंतर सोनिपत रोड वरील पाण्याच्या टाकीत त्यांनी दोन्ही मुलींसह उडी घेतली. मिनाक्षी आणि त्यांच्या छोट्या मुलीचा बुडून मृत्यू झाला. मोठी मुलगी पोहत बाहेर आल्याने तिचा जीव वाचला आहे.

खासगी रुग्णालयात पाठविलेल्या सर्व कोरोना रुग्णांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

दरम्यान, डॉक्टर प्रमोद आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, 'धावपळीच्या आयुष्याचा कंटाळा आला आहे. माझ्या मृत्यूला देवच जबाबदार असून, पोलिसांनी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor passes away later wife jumps into wate tank with daughters at haryana