
दिल्लीतील एका वरिष्ठ डॉक्टरचे कोरोना लस घेतल्यानंतर आपल्या पत्नीसोबतचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली- दिल्लीतील एका वरिष्ठ डॉक्टरचे कोरोना लस घेतल्यानंतर आपल्या पत्नीसोबतचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर केके अग्रवाल कोरोनाची लस घेतल्यानंतर लाईव्ह स्ट्रिमिंग करत होते. यावेळी त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. यादरम्यान, त्यांचे पत्नीसोबत जे संभाषण झाले, ते सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
Dr KK Aggarwal(a very prominent doctor often seen on TV)went to get vaccination with his secretary but without his wife
Remember to take your wife along for vaccination... and if not, dont go LIVE before reaching home pic.twitter.com/XrbHQzRTo3— Abhijit_Ghosh (@BlackKn59506535) January 27, 2021
लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना अग्रवाल यांना पत्नीचा फोन आला. यावेळी पत्नीने त्यांना लस घेतली आहे का, अशी विचारणा केली. त्यावर ते म्हणतात, "मी हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्यासाठी गेलो होते, पण त्यांनी मला लगेच लस घ्यायला सांगितली, त्यामुळे मी घेतली.'' अग्रवाल यांच्या उत्तराने पत्नी समाधानी होत नाही. त्या अग्रवाल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करतात.
तिच्या जन्मानंतर दोन वर्षांनी आई-वडिलांनी केलं होतं लग्न; शाळेत नाव बदलून जायची
तुम्ही मला सोबत का घेऊन गेलं नाही? आणि माझ्यासोबत खोटं बोलू नका, असं श्रीमती अग्रवाल म्हणतात. पत्नीला समजावत अग्रवाल म्हणतात, तुलापण सोमवारी लस देण्यात येईल. पत्नीचा चिडचिडपणा कायम असल्याने अग्रवाल त्यांना सांगतात की ''मी सध्या लाईव्ह आहे. घरी येऊन बोलतो.'' तेव्हा डॉक्टरची पत्नी म्हणते की, "मी लाईव्ह येऊन आता तुमची ऐशी-तेशी करते.'' त्यानंतर त्या फोन ठेवून देतात.
23 जानेवारीला कोरोनाची लस घेतल्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी लाईव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. अनेकांनी या व्हिडिओवर सोशल मीडियातून प्रतिक्रिया दिली आहे. 'श्रीमती अग्रवाल यांनी खरा कोण बॉस आहे हे दाखवून दिलं. डॉ. अग्रवाल यांना चांगला दम भरला. बायका शेवटी बायकाच राहणार', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
करदात्यांना आजपासून भरता येणार ऑफलाइन कर ! ऑनलाईनचे काम पाहणारा कंत्राटदार पसार
डॉ. अग्रवाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या कठीण काळात माझ्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटत असेल तर मला आनंद आहे. शेवटी हास्य हेच मोठे औषध आहे. माझ्या पत्नीला माझ्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी आहे. मी तुम्हाचा आवाहन करतो की संधी मिळाली तर सर्वांनी कोरोनाची लस घ्यावी. लस न घेणे हेच खरे मोठे हास्य ठरेल, असं ते म्हणाले आहेत.