तिच्या जन्मानंतर दोन वर्षांनी आई-वडिलांनी केलं होतं लग्न; शाळेत नाव बदलून जायची

टीम ई सकाळ
Thursday, 28 January 2021

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनची मुलगी श्रुती हासन आज (28 जानेवारी) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये लक चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या श्रुतीला हिंदीमध्ये फारसं यश मिळालेलं नाही.

नवी दिल्ली - दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनची मुलगी श्रुती हासन आज (28 जानेवारी) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये लक चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या श्रुतीला हिंदीमध्ये फारसं यश मिळालेलं नाही. मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिने खूप काम केलं आहे. एवढंच नाही तर गायनातसुद्धा तिनं करिअर केलं आहे. कमल हासन आणि त्यांची पत्नी सारिका यांनी श्रुतीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी लग्न केलं होतं.

कमल हासन यांनी त्यांची पहिली पत्नी वानी गनपथी यांना घटस्फोट दिला. त्यानंतर सारिका ठाकूर यांच्याशी लग्न केलं. त्याआधी दोघेही लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. श्रुती तिच्या शाळेत जाताना खरं नाव न सांगता खोट्या नावाने जात असे. शाळेत आपण एका सुपरस्टारची मुलगी आहे हे समजू नये यासाठी तिने नाव बदललं होतं. 

श्रुतीने तिच्या करिअरची सुरुवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केली होती. त्यात तिने अनेक चित्रपटांत गाणी गायली होती. वयाच्या चौथ्या वर्षी वडील कमल हासन यांच्या हे राम चित्रपटात एक लहानशी भूमिकासुद्धा साकारली होती. श्रुतीने हिंदी चित्रपटांशिवाय तेलुगु, तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

हे वाचा - चला दंगल समजून घेऊ; मराठी अभिनेत्रीचं वेबसिरीजमध्ये पदार्पण

2011 मध्ये तेलगु चित्रपट 'अनागनागा ओ धीरूडू' आणि तामिळ चित्रपट  '7ओम अरिवु' साठी तिला  बेस्ट फिमेल डेब्यु साउथ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर 2015 मध्ये तेलुगू चित्रपट रेस गुर्रंसाठी तिला बेस्ट अॅक्ट्रेस साउथ हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south actress Shruti Hassan happy birthday life story