
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकरीसाठी २५ लाख तरुणांनी नाव नोंदविले असून, त्यामध्ये हजारो उच्चशिक्षित तरुणांचीही नावे आहेत. संकेतस्थळावरील नावांमध्ये ४८११ एमबीबीएस डॉक्टर असून, ८६ हजार इंजिनिअर आणि १८ हजार ८०० एमबीए झालेले तरुण आहेत. राज्य सरकारकडूनही या तरुणांची नोंद ‘आकांक्षित तरुण’ अशी करण्यात आली आहे.