Govt Doctor News: वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांना झटका! आता खासगी प्रॅक्टिसला लागणार कात्री

महाविद्यालयांत ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य, ‘एनएमसी’कडून नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी
Sasoon-Hospital_file photo
Sasoon-Hospital_file photosakal
Updated on

नवी दिल्ली : वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापनाला टाळून खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या अध्यापकांच्या नाड्या केंद्र सरकारने आवळल्या आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) अध्यापकांच्या खासगी प्रॅक्टिसला पायबंद घालताना महाविद्यालयांतील ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे.

‘एनएमसी’ने ‘मिनिमम स्टँडर्ड ऑफ रिक्वायरमेंट्स फॉर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस-२०२३’ (पीजीएमएसआर-२०२३) या शीर्षकाखाली मागील आठवड्यामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (doctors in medical colleges have restrictions on private practice by centre)

Sasoon-Hospital_file photo
पाकिस्तानात 'बुलेट' इतकी स्वस्त का आहे?

या नव्या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांत कार्यरत असलेल्या अध्यापकांना खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही, प्रत्यक्ष कामाचा वेळ विचारात घेतला तर त्यांची महाविद्यालयांत ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. (Latest Marathi News)

रुग्णालयामध्ये आता ८० टक्के बेड हे सातत्याने ज्यांना औषधोपचाराची आणि देखभालीची गरज आहे, अशा रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावे तर एकूण बेडपैकी १५ टक्के बेड हे पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी राखीव ठेवले जावे, असे सांगण्यात आले आहे. त्यातही अतिदक्षता विभागातील बेडचा अर्थात रुग्णांचा समावेश असावा, असे नमूद करण्यात आले.

Sasoon-Hospital_file photo
Chandigarh Mayor Election: महापौरपदाच्या निवडणुकीत असं करू शकतात तर... 'इंडिया'च्या पहिल्या पराभवानंतर केजरीवालांची टीका

नियम पाळावे लागणार

रुग्णालयाची इमारत उभारताना देखील राष्ट्रीय पातळीवर निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्यात यावे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमांचेही पालन करावे लागेल. ज्या प्रमाणे रुग्णालयातील बेडची संख्या वाढते त्यातुलनेत कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Sasoon-Hospital_file photo
Raj Thackeray Vs Eknath Shinde: ठाण्यात राज ठाकरेंची मोठी खेळी! CM शिंदेंना दिला मोठा धक्का; पदाधिकाऱ्यांचा सेनेला रामराम

डिजिटल डेटाचाही आग्रह

रुग्णालयांना त्यांच्या प्रयोगशाळा या सातत्याने अपडेट कराव्या लागणार आहेत. तंत्रज्ञानाच्या बदलाचा वेग लक्षात घेऊन त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे अपेक्षित आहे. विविध विभाग आणि प्रयोगशाळांचा डिजिटल डेटा उपलब्ध असणेही गरजेचे आहे. सर्व आधुनिक यंत्रणांना सज्ज अशी रक्तपेढी रुग्णालयांनी उभारणे अपेक्षित असल्याचे सरकारने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com