237 किलो वजनाच्या मिहिरवर यशस्वी शस्त्रक्रिया

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

मिहीरवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. प्रदीप चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा मिहिरला पाहिले त्यावेळी त्याला स्वत:च्या पायावर उभेही राहात येत नव्हते.  एवढे वजन असल्याने त्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान खूप अडचणी आल्याचे त्यांनी म्हटले.

नवी दिल्ली - जगातला सर्वाधिक वजनाचा किशोरवयीन मुलगा मिहीर जैन याचे वजन तब्बल 237 किलो आहे. दिल्लीतल्या मिहिरवर सध्या साकेत येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली. 

मिहीरवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. प्रदीप चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा मिहिरला पाहिले त्यावेळी त्याला स्वत:च्या पायावर उभेही राहात येत नव्हते.  एवढे वजन असल्याने त्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान खूप अडचणी आल्याचे त्यांनी म्हटले.. मिहीरच्या मांसपेशींच्या खाली 10 इंचांचा चरबीचा थर होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी नेहमीची साधने वापरता येणे शक्य नव्हते. त्यामुळे मोठ्या वैद्यकीय अवजारांचा वापर करत ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

मिहिरच्या पालकांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी दिलेल्या माहितीनुसार, तो जन्माला आला तेव्हा त्याचे एका सामन्य मुलासारखे अडीच किलो वजन होते. परंतु, हळूहळू त्याचे वजन वाढत गेले. कुटुंबात सगळेच वजनदार असल्याने आधी त्याच्या पालकांनी मिहीरच्या वजनाकडे दुर्लक्ष केले. मिहीर पाच वर्षांचा होता तेव्हा त्याचे वजन 60-70 किलो होते. नंतर वजन इतके वाढले की त्याला चालताही येईना, दुसरीनंतर तो शाळेत गेला नाही. त्याचे शिक्षण घरीच झाल्याचे त्याच्या आई पूजा जैन यांनी सांगितले.

2010 मध्ये त्याच्या पालकांनी मिहिरच्या वजनाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला. परंतु, तेव्हा शस्त्रक्रियेसाठी मिहीर खूपच लहान असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

Web Title: Doctors operate on 237 kg Delhi boy