मनात कोरोनाची भिती असेल तर सरकारने तुमच्यासाठी घेतलाय मोठा निर्णय 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जुलै 2020

आता आपल्याला याची चिंता करण्याची गरज नाही. आता आपण वैद्यकीय स्लिपशिवाय कोरोना तपासणी करु शकता. नुकतीच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी मेडिकल स्लिपची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसची भीती आजकाल प्रत्येकाच्या मनात आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर तर प्रत्येकाने असा विचार सुरू केला आहे की एक दिवस कोरोना विषाणूचे आपण बळी पडू. अशा परिस्थितीत, केवळ चाचणी करून आपण स्वत: ला समाधानी राहू शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठी नसेल तर कोरोनाची तपासणी करु शकत नाही. त्यामुळे लोक डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असत. आता आपल्याला याची चिंता करण्याची गरज नाही. आता आपण वैद्यकीय स्लिपशिवाय कोरोना तपासणी करु शकता. नुकतीच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी मेडिकल स्लिपची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनावश्यक डॉक्टरांच्या परवानगीमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये अधिक दबाव आहे, असे राज्यांना सांगण्यात आले आहे. या नियमामुळे सामान्य लोकांना कोरोना चाचणी घेण्यास बराच विलंब होत आहे. आयसीएमआरने पुढे लिहिले आहे की, राज्यातील सर्व चाचणी प्रयोगशाळांना कोणत्याही वैद्यकीय स्लिपशिवाय चाचणी घेण्यास परवानगी देण्यात यावी. त्याचबरोबर केवळ सरकारी डॉक्टरांकडूनच तपासणी स्लिप घेण्याची गरज नाही. सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनाही तपासणीस परवानगी देण्याचा अधिकार मिळायला हवा असल्याचेही म्हटले आहे.
------------------
'या' सरकारने लावले १ लाख ४० हजार चिनी सीसीटीव्ही कॅमेरे; समोर आला नवा वाद
-------------------
चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्या वर
-------------------
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ६ लाखांच्या वर गेली आहे असून आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०१९५२ झाला आहे. यापैकी २५७६१२ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर १७७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या २२६४८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. त्यातच मुंबई आणि उपनगरमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे आता नवं आव्हान तयार झालं आहे. लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्याने कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. महाराष्ट्रात आता ज्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक महापालिकांनी १० दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors prescription not mandatory for COVID-19 test