Does Pouring Milk in River Purify Water
esakal
Madhya Pradesh Incident: मध्य प्रदेशातील सीहोर येथे धार्मिक विधीनंतर नर्मदा नदीत सुमारे ११ हजार लिटर दूध सोडण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावह वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पर्यावरणतज्ज्ञांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा प्रकारे हजारो लिटर दूध नदीत टाकल्याने पर्यावरणावर गंभीर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.