'ते पक्ष काळा पैसा, दहशतवादाचे समर्थन करतात का?'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णयावर टीका करणारे समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष दहशतवाद आणि काळा पैसा यांचे समर्थन करतात का? असा प्रश्‍न भारतीय जनता पक्षाच राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे.

शाह म्हणाले, "मागील दोन दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक ऐकत आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मला विचारावेसे वाटते की त्यांना एवढा काय त्रास होत आहे? ते काळ्या पैशाचे समर्थन करतात का? बनावट नोटांवर चालणाऱ्या दहशतवादाचे ते समर्थन करतात का? नोटा बंद केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष हे चार पक्ष स्वत:ला उघडे करत आहेत.' अशी टीका शाह यांनी केली आहे.

जीवनावश्‍यक वस्तू मिळणे लोकांना अवघड झाले असल्याचे म्हणत मुलायमसिंह यादव यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय आठवड्यासाठी मागे घेण्याची मागणी केली आहे. तर काही सहकाऱ्यांना सांगून मोदी यांनी नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. याशिवाय राहुल गांधी यांनीही नोटा बंद करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

Web Title: Does SP, BSP support terrorism, black money, asks Amit Shah