कुत्रा चावल्यानं म्हशीचा मृत्यू, तिच्या दुधापासून बनवलेला रायता; उत्तरकार्यात जेवलेले २०० जण धावले दवाखान्यात

Viral News: उत्तर प्रदेशातल्या एका गावात म्हशीचा कुत्रा चावल्यानं मृत्यू झाल्यानंतर तब्बल २०० गावकऱ्यांनी रेबिजची लस घेतलीय. गावात उत्तरकार्याच्या जेवणात म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या दह्याचा वापर करण्यात आला होता.
Rabies Scare After Milk From Dead Buffalo Used In Feast

Rabies Scare After Milk From Dead Buffalo Used In Feast

Esakal

Updated on

उत्तर प्रदेश: एका दुभत्या म्हशीला कुत्रा चावल्यानं गावातील तब्बल २०० जणांनी रेबिजची लस घेतल्याचा प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशातील बदायूँ इथं ही घटना घडलीय. बदायू जिल्ह्यातल्या उझानी इथं कुत्रा चावल्यानं म्हशीचा मृत्यू झाला. या म्हशीचं दुधापासून बनवलेल्या दह्याचा वापर केलेला रायता गावातील लोकांनी खाल्ला होतं. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. शेवटी सर्व गावकरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले आणि खबरदारी म्हणून रेबिजची लस टोचून घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com