
पन्ना टायगर रिजर्वमध्ये कोअर एरियातला हा व्हिडीओ आहे. यात पाळीव कुत्रा वाघांच्या परिसरात घुसल्याचं समोर आलंय. यानंतर संचालक अंजना सुचिता तिर्की यांनी चौकशी समिती स्थापन केलीय. वाघांच्या परिक्षेत्रात कुत्रा घुसल्याच्या घटनेची दखल घेत याची चौकशी एडी मंडला यांच्याकडे सोपवण्यात आलीय. हा गंभीर विषय असून कुत्र्यांमुळे वाघांना गंभीर दुखापत होऊ शकतो. याची चौकशी केली जात आहे. यात जे कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.