Video: कुत्र्याने हेल्मेट घालून केला दुचाकीवरून प्रवास

वृत्तसंस्था
सोमवार, 13 जानेवारी 2020

दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण, एका कुत्र्याने हेल्मेट घालून दुचाकीवरून प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्यापासून काही तरी शिका, अशी प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

चेन्नई : दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण, एका कुत्र्याने हेल्मेट घालून दुचाकीवरून प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुत्र्यापासून काही तरी शिका, अशी प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

Video: कुत्र्याने बदलला गिअर अन्...

चेन्नई येथील विरुगमबक्कम भागात कुत्र्याने हेल्मेट घालून दुचाकीवरून प्रवास केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाळीव कुत्रा मालकाच्या मागे दुचाकीवर बसला आहे. दुचाकीवरून प्रवास करताना दोघांनीही हेल्मेट घातले आहे. व्हिडीओ व्हायरल नेटिझन्सनी दोघांचेही कौतुक केले आहे.

कुत्री खूप चांगली; पण तिचे अनैतिक संबंध...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुत्रा दुचाकीवर बसला असून, मालकाच्या खांद्यावर आपले दोन्ही पाय ठेऊन आनंदाने प्रवास करताना दिसत आहे.

Video: कुत्र्याने महामार्गावर चालवली दुचाकी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog wearing helmet for safety in tamilnadu video viral