
कुत्रा हा अनेकांच्या कुटुंबातील सदस्य असतो. मालकाच्या मदतीला तो नेहमी धावून येत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. परंतु, येथील एक कुत्रा चर्चेत आला आहे.
बीजिंग (चीन): कुत्रा हा अनेकांच्या कुटुंबातील सदस्य असतो. मालकाच्या मदतीला तो नेहमी धावून येत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. परंतु, येथील एक कुत्रा चर्चेत आला आहे. कुत्र्याने मोटारीचा गिअर बदलला आणि मोटार थेट स्विमिंग पुलमध्ये घुसली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
कुत्री खूप चांगली; पण तिचे अनैतिक संबंध...
चीनमधील झिंजियांग प्रांतात घडलेली घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मोटारीच्या मालकाचे एक दुकान आले. मोटार उभी करून तो बाहेर आला होता. पण, मोटारीचे इंजिन सुरूच होते. यावेळी पूछ नावाचा कुत्रा गाडीतच बसला होता. त्याच्याकडून मोटारीचा गिअर बदलला गेला आणि मोटार थेच स्विमिंग पूलमध्ये पडली.
गाडीचा मालक परत आला तेंव्हा मोटार स्विमिंग पूलमध्ये बुडलेली दिसली. शिवाय, मोटारीमधून कुत्रा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. मालकाने शेवटी एक फळी टाकून या कुत्र्याला बाहेर काढले.
गुन्हेगाराच्या कुत्र्यावर करतात पोलिस प्रेम!
दरम्यान, गेल्या महिन्यात फ्लोरिडामध्येही अशीच एक घटना घडली होती. मोटारीचा रिव्हर्स गिअर पडल्याने मोटारी गोलाकार फिरत राहिली. यावेळी परिसरातील रहिवाशांनी या गाडीत अडकलेल्या कुत्र्याला वाचवले होते.