व्यवसाय करणे सरकारचे काम नव्हे - पंतप्रधान मोदी

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली - फायदेशीर ठरत नसलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोरदार समर्थन केले. ‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नव्हे. करदात्यांच्या पैशांवर तोट्यात असणारे उद्योग सांभाळण्यापेक्षा त्या पैशाचा वापर कल्याणकारी योजनांसाठी वापरता येईल,’ असे प्रतिपादन मोदी यांनी केले. ‘आधुनिकीकरण आणि विक्रीतून पैसा’ हे धोरण सरकार राबविणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थसंकल्पात खासगीकरणाला महत्त्व दिल्याच्या मुद्द्यावर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मोदी म्हणाले,‘‘देशातील कार्यरत नसलेल्या किंवा क्षमतेपेक्षा कमी उत्पादन असलेल्या जवळपास १०० सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण करून अडीच लाख कोटींच्या गुंतवणूकीच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. उद्योग आणि व्यवसायांना पाठबळ देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, पण सरकारनेच हे उद्योग चालवावेत, हे आवश्‍यक नाही. खासगी क्षेत्राच्या प्रवेशामुळे गुंतवणूक वाढेल, आधुनिकीकरणाला वेग येईल.

या खासगीकरणातून उपलब्ध होणारा पैसा आरोग्य, शिक्षण, जलव्यवस्थापन अशा अनेक कल्याणकारी कामांकडे वळविता येईल.’’ अणु ऊर्जा, अवकाश आणि संरक्षण, वाहतूक आणि दूरसंचार, ऊर्जा, पेट्रोलियम, कोळसा आणि खनिजे, बँकिंग, वित्त सेवा या क्षेत्रांमध्ये मात्र सरकार आपली उपस्थिती कायम ठेवणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. जनकल्याणाकडे लक्ष देणे सरकारचे कर्तव्यच असून उलट ज्यावेळी सरकारने उद्योग करण्याचा प्रयत्न केला आहे, तिथे नुकसान झाले आहे, असा दावाही मोदींनी केला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com