esakal | मोदींची अवस्था डोनाल्ड ट्रम्पपेक्षाही बिकट होईल!
sakal

बोलून बातमी शोधा

Trump_Modi

नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगलखोर आहेत. ट्रम्प यांचे काय झाले. त्यांचे (मोदीं) यापेक्षाही अधिक हाल होतील.

मोदींची अवस्था डोनाल्ड ट्रम्पपेक्षाही बिकट होईल!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

कोलकता/ साहागंज (पश्‍चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देशभरात खोटेपणा आणि विद्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवराजसिंह यांचे योगींच्या पावलावर पाऊल; मुघलकालीन शहराचं बदलणार नाव​

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हिंसेने काहीच साध्य होत नाही. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगलखोर आहेत. ट्रम्प यांचे काय झाले. त्यांचे (मोदीं) यापेक्षाही अधिक हाल होतील. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत आपण गोलकिपर होऊ आणि आपण त्यांना (भाजपला) एकही गोल करू देणार नाही. त्यांचे सर्व शॉटस गोल पोस्टच्या वर जातील. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीच्या सीबीआय चौकशीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, ही चौकशी महिलांचा अपमान आहे. भाजपच्या राजवटीत महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आपल्या महिलांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

स्टेडियमला नाव मोदींचं; बॉलिंग एंड अंबानी आणि अदानींचे!​

तृणमूल पक्षात महिलांना सन्मान दिला जातो. आईप्रमाणे वागणूक दिली जाते. आपल्या राज्यात शांतता कशामुळे आह. कारण आपली पश्‍चिम बंगालची भूमि ही माता-भगिनींची आहे. भाजपला आव्हान देत त्या म्हणाल्या, ‘खेला तो होबेई रे’ (सामना तर होणारच). या सामन्यातून भाजपला आपण सरळ करणार आहोत. बंगालच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर त्यांचे देशातून उच्चाटन होईल, जर भाजपची सत्ता आली तर ते ठग मंडळींची भरती करतील, असेही त्या म्हणाल्या.

स्वामी नारायण मंदिर : 199 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जगातील पहिल्या मंदिराची स्थापना

गुजरात बंगालवर नियंत्रण मिळवू शकत नाही. बंगालवर बंगालींचेच नियंत्रण राहील. मोदी हे बंगालला घेऊ शकत नाहीत. ठग लोक बंगालला नियंत्रित करू शकणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, यावेळी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांच्यासह अनेक बंगाली कलाकारांनी बुधवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

आतापर्यंत मी अनेकदा मानसिक त्रास सहन केला आहे आणि अजूनही करत आहे. माकप, कॉंग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. ते खोटे बोलून कधीही जिंकू शकत नाही.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प.बंगाल

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image