मोठी बातमी - सोमवार पासून देशांतर्गत विमान उड्डाणं होणार सुरु

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

देशांतर्गत विमान सेवा सोमवार (ता. 25) पासून सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई : देशांतर्गत विमान सेवा सोमवार (ता. 25) पासून सुरू करण्यात येणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. यासंदर्भात सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना उड्डाणासाठी आणि कोरोनासंदर्भातील सुरक्षेच्या दृष्ट्रीने तयार राहण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्ट्रीने नागरी उड्डाण मंत्रालयाकडून नियम आखुन दिले जाणार असून बुकिंग देखील लवकर सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यासंदर्भात तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. 

मोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुमारे 22 मार्च पासून विमानसेवा अडचणीत आल्या आहे. त्यानंतर काही दिवसाने विमानसेवा पुर्णपणे ठप्प करण्यात आली होती. मात्र,परदेशांमध्ये अडकलेल्या काही भारतीय नागरिकांना वंदे भारत अभियानांतर्गत देशात आणण्यात आले होते. मात्र, देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याने, सर्व विमान कंपन्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. 

मोठी घोषणा, 1 जूनपासून धावणार नॉन AC ट्रेन्स, तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या...

गुरूवारी (ता.21)रोजी नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यानंतर विमान कंपन्यांना कोणते नियम पाळावे लागतील, प्रवाशांची सुरक्षा कशी घेतली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती दिली जाणार आहे. त्यानंतरच देशांतर्गत विमान सेवा देणाऱ्यांकडून नविन नियमांची माहिती मिळू शकनार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Domestic civil aviation operations will recommence in a calibrated manner from Monday 25th May