Domestic flights become expensive
ESakal
देश
Flight Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला फटका! दिवाळीपूर्वी रस्तेसह हवाई वाहतूक सेवा महागली; काय आहेत दर?
Diwali Festival: दिवाळीपूर्वी देशांतर्गत विमान तसेच बस प्रवासाच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे.
नवी दिल्ली : दिवाळीच्या अगोदर देशांतर्गत विमान भाड्यात वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईहून लखनऊ व पाटण्याकडे जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर सिंगापूर आणि मलेशियाच्या तुलनेतही जास्त झाले आहेत, तर काही मार्गांवर भाडे ३० हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे दरपत्रक विमान कंपन्यांनी जारी केले आहे.