
भारतात आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये वाढ झालेली दिसून आली.
नवी दिल्ली : भारतात आज देखील पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये वाढ झालेली दिसून आली. जवळपास 26 ते 30 पैशांनी पेट्रोलच्या भावांमध्ये ही वाढ झाली आहे. तर डिझेलच्या भावांमध्ये 30 ते 35 पैशांनी वाढ झाली आहे. सध्या मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव 95.21 रुपये प्रति लिटर आहे. तर दिल्लीमध्ये 88.73 रुपये आहे. तर डिझेलचे भाव मुंबईत 86.04 रुपये आहेत तर दिल्लीमध्ये 79.06 रुपये आहेत. याचप्रमाणे पेट्रोलचे भाव वाढत गेले तर लवकरच संपूर्ण देशामध्ये पेट्रोल शंभरी पार करेल यात शंका नाही.
Delhi: Petrol and diesel prices at Rs 88.99/litre (increase by Rs 0.26) and Rs 79.35/litre (increase by Rs 0.29), respectively today.
— ANI (@ANI) February 15, 2021
आजपासून दिल्लीवासीयांच्या खिशावर महागाईची वक्रदृष्टी पडणार आहे. कारण दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढणार आहे. नवे दर सोमवारी दुपारी 12 वाजल्यानंतर लागू होणार आहेत. या किंमती वाढल्यानंतर 14.2 किलोचे सिलेंडर आता 769 रुपयांना होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे भारतात देखील दररोज पेट्रोलचे भाव वाढतानाच दिसत आहेत. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये प्रीमीयम पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार गेल्याने जुन्या पेट्रोल मशीन्स बंद कराव्या लागल्या आहेत. या परिस्थितीला पाहता दिल्लीतील पेट्रोल पंपांनी या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. जेणेकरुन शंभरी पारची परिस्थिती उद्भवली तरी पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ येऊ नये.
हेही वाचा - Video:गमछा दाखवत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा; म्हणाले, 'कोणत्याही परिस्थितीत...'
महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात पेट्रोल 100 च्या पार
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये रविवारी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार गेले आहेत. परभणी जिल्हा पेट्रोल डीलर असोशिएशनचे अध्यक्ष अमोल भेडसुरकर यांनी सांगितलं की एडडीटीव्ह्स पेट्रोलचे दर 100.16 रु. प्रति लीटर वर गेले आहे. तर अनलीडेड पेट्रोल 97.38 रुपये झाले आहे. राज्यात परभणीतील पेट्रोल सर्वांत महाग आहे. कारण दळणवळणामध्ये परभणी दूरवर आहे. परभणीमध्ये पेट्रोल नाशिक जिल्ह्यामधून येतं. म्हणजे जवळपास 340 किमी अंतर कापावं लागतं. भेडसुरकर यांनी म्हटलंय की, किंमत 10 पैशांनी वाढली तरी आम्हाला प्रत्येक टँकरमागे 3000 रु. अतिरिक्त खर्च करावे लागतात. त्यामुळेच इथे इंधन महाग आहे. भोपाळ शहरामध्ये प्रीमीयम पेट्रोलचे भाव 100 च्या पार गेले आहेत. त्यामुळे जुन्या मशीन्समध्ये आता तीन अंकी संख्या येतच नाहीये. त्यामुळे तिथल्या पेट्रोलची विक्री बंद केली गेली आहे. मात्र, अद्याप दिल्लीमध्ये अशी परिस्थिती नाहीये.
जाणून घ्या मुख्य शहरांतील आजचे दर
शहर Petrol (Rs/litre) Diesel (Rs/litre)
दिल्ली 88.99 79.35
कोलकाता 90.25 82.94
मुंबई 95.46 86.34
चेन्नई 91.19 84.44
बेंगलुरु 91.97 84.12
हैद्राबाद 92.53 86.55
पटना 91.38 84.57
लखनऊ 87.64 79.72
जयपूर 95.44 87.69