
Arvind Kejriwal: हायकोर्टानं दंड ठोठावल्यानंतर केजरीवाल भडकले! म्हणाले, पंतप्रधानांचं शिक्षण...
नवी दिल्ली : गुजरात हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भडकले असून त्यांनी याचा निषेधही केला आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या शिक्षणाची माहिती त्यांनी माहिती अधिकारातून मागवल्यानं हायकोर्टानं त्यांना २५००० हजारांचा दंड ठोठावला आहे. (Don people have right to know how educated their PM is Arvind Kejriwal after Gujarat HC order)
हायकोर्टाच्या आदेशाची बातमी शेअर करत आम आदमी पार्टीनं ट्विटरवर एक सवाल विचारला आहे. देशातील जनतेला आपले पंतप्रधान किती शिकले आहेत हे जाणून घ्यायचा अधिकार नाही का? जर एखाद्यानं पंतप्रधानांची डिग्रीची मागणी केली असेल तर त्यामध्ये चूक काय आहे. यावर केजरीवालांनी असंही म्हटलंय की, अडाणी किंवा कमी शेकलेला पंतप्रधान हा देशासाठी घातक असतो.
मुख्य माहिती आयुक्तांनी गुजरात विद्यापीठाला आदेश दिले होते की, महिती अधिकारांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एमएच्या डिग्रीची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देण्यात यावी. या आदेशाला गुजरात हायकोर्टानं शुक्रवारी स्थगिती दिली. त्याचबरोबर हायकोर्टानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २५,००० रुपयांचा दंडही ठोठावला.
हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
दरम्यान, माहिती अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याचं कारण देत गुजरात विद्यापीठानं मुख्य माहिती आयुक्तांच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर हायकोर्टानं नव्यानं आदेश देत केजरीवालांना दंड ठोठावला.