हिंदी चित्रपटसृष्टीला 'बॉलीवुड' म्हणू नका - विजयवर्गीय 

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जून 2018

भारतीय चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, एफआयसीसीआयने म्हटले  की, हिंदी चित्रपट सृष्टीचे व्यवसाय 165 अब्जांपर्यंत गेले आहेत.
भारतात, दोन डझन भाषांमध्ये चित्रपट बनवले जातात आणि दंगल सारख्या हिंदी चित्रपटांमधून 1600 कोटी रुपये आणि बाहुबली-2 दोन हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 'बॉलीवुड' हा शब्द न वापरण्यासंबंधी भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय हे माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत. बॉलीवूडमधील चित्रपट हे हॉलीवूड चित्रपटांचे अनुकरण आहे, तसेच बॉलीवूड हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीला बीबीसीने दिले असल्याचे कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले. 

"काही दिवसांपूर्वी जेष्ठ दिग्दर्शक सुभाष घई मला भाजपच्या मुख्यालयात भेटण्यास आले होते. त्यांनी मला सांगितले की बीबीसीने हिंदी चित्रपट उद्योगाला बॉलीवुड हा शब्द दिला आहे, हे दाखवण्यासाठी की येथे काढलेले चित्रपट फक्त हॉलीवूड चित्रपटांच्या कॉपी आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीला बदनाम करण्यासाठी हा शब्द वापरला जात आहे,'' असे मत विजयवर्गीय यांनी मांडले.

विजयवर्गीय यांनी सांगितले की, 'आधीच सोशल मीडियावर घईंनी #DontCallItBollywood या हॅशटॅगखाली अभियान सुरू केले आहे. 
ते म्हणाले पत्राच्या माध्यमातून राज्यवर्धन राठोड यांना बॉलीवूड या शब्दामागील युक्तिवाद समजून सांगून बॉलीवुड या शब्दाचा माध्यमांमधील वापर बंद करण्याची विनंती करेन.' "आमच्याकडे  सत्यजित रे आणि दादासाहेब फाळकेंसारखे  दिग्गज दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट बनविले आहेत. त्यामुळे आम्ही हॉलीवूड चित्रपटांची कॉपी करत आहोत हे आम्ही कसे मान्य करू शकतो?" असा प्रश्न  त्यांनी उपस्थित केला. 

भारतीय चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, एफआयसीसीआयने म्हटले  की, हिंदी चित्रपट सृष्टीचे व्यवसाय 165 अब्जांपर्यंत गेले आहेत.
भारतात, दोन डझन भाषांमध्ये चित्रपट बनवले जातात आणि दंगल सारख्या हिंदी चित्रपटांमधून 1600 कोटी रुपये आणि बाहुबली-2 दोन हजार कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

त्यांनी स्पष्ट केले की, एनडीए सरकारने हिंदी चित्रपट सृष्टीला औद्योगिक दर्जा दिला. ज्यामुळे माफियांचे नियंत्रण काढून टाकले गेले आणि हिंदी चित्रपट सृष्टीला संस्थात्मक दर्जा मिळाला. हिंदी चित्रपट हे हॉलीवूड चित्रपटाची कॉपी नसते हे दाखवण्याची हीच ती वेळ आहे असे ते म्हणाले. 
विजयवर्गी यांच्या मते, भारतीय चित्रपट सृष्टीला "हिंदी चित्रपटसृष्टी किंवा तमिळ चित्रपटसृष्टी" म्हणून ओळखले जावे आणि बांगला, ओडिशा किंवा भोजपुरी चित्रपटसृष्टीला टोलीवुड, कॉलीवूड इ. म्हणून ओळखले जावे, ते अधिक उपयुक्त ठरेल. ही गुलामी मानसिकता आहे यापासून मुक्त होण्यासाठी मीडियाने पुढे यायला हवे. 

Web Title: dont cal Bollywood to hindi film industry said kailas vijayvargiy