'राहुल गांधींनी भाजपच्या सापळ्यात अडकू नये'

Rahul Gandhi
Rahul Gandhi

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता वर्तविली जात असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी मात्र त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. भाजपने राहुल यांच्या बाजूने सापळा रचला असून, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत यामध्ये अडकू नये, तसे करणे आत्मघाती ठरू शकते, असे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. सध्या "रिम्स'मध्ये उपचार घेत असलेल्या लालूंनी एका इंग्रजी दैनिकाशी संवाद साधताना उपरोक्त मत मांडले. 

लालू म्हणाले, की राहुल यांनी राजीनामा दिल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या सर्वच प्रादेशिक पक्षांचे मोठे नुकसान होईल. गांधी आणि नेहरू कुटुंबाहेरील कुणा दुसऱ्या व्यक्तीकडे पक्षाचे अध्यक्षपद दिले तरीसुद्धा मोदी आणि शहा त्याला कळसूत्री बाहुलेच म्हणतील. राहुल आणि सोनिया रिमोटच्या माध्यमातून पक्ष चालवीत असल्याचा आरोप ते करतील. हा खेळ पुढील निवडणुकीपर्यंत चालेल. यामुळेच भाजपला ही संधी दिली जाऊ नये.'' 

विधानसभेसारखे लढले 
विरोधकांनी पराभव स्वीकारून आत्मचिंतन करायला हवे, जातीयवादी पक्षांविरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यायला हवे. याखेपेस भाजपला सत्ताच्युत करणे हाच विरोधकांचा समान कार्यक्रम होता. पण आम्ही त्याला राष्ट्रीय स्वरूप देऊ शकलो नाही, विरोधकांनी लोकसभेची निवडणूक विधानसभेसारखी लढविली. प्रत्यक्ष रणनीती तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात विरोधकांना अपयश आल्याचेही यादव यांनी नमूद केले. 

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडू नये, काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याने त्याला चालविताना मोठी कसरत करावी लागते. ज्येष्ठांनी सहकार्य न केल्याने राहुल एकाकी पडले होते. आताही राहुल यांनी खंबीरपणे उभे ठाकायला हवे. 
- रजनीकांत, अभिनेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com