'राज्यात हस्तक्षेप करू नका'; मोदींची 'युपी'तील खासदारांना सूचना

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

मोदी म्हणाले, "खासदारांनी जनतेच्या कौलाचा आदर राखायला हवा आणि विकासासाठी काम करायला हवे. खासदारांनी राज्याच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये.' लवकरच लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) "एक देश, एक टॅक्‍स' या घोषवाक्‍यासह प्रचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील सर्व खासदारांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी उत्तर प्रदेशमधील कामकाजात खासदारांनी हस्तक्षेप न करण्याची सूचना दिली आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर मोदी यांनी प्रथमच उत्तर प्रदेशमधील सर्व खासदारांची बैठक बोलाविली. खासदारांनी हलगर्जीपणा करू नये, असा सल्ला मोदी यांनी यावेळी दिला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "खासदारांनी जनतेच्या कौलाचा आदर राखायला हवा आणि विकासासाठी काम करायला हवे. खासदारांनी राज्याच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये.' लवकरच लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) "एक देश, एक टॅक्‍स' या घोषवाक्‍यासह प्रचार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, पक्षाचे नेते मुरली मनोहर जोशी आदींनीही खासदारांशी संवाद साधला. सरकारने दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याचा खासदारांनी सर्वतोपरी प्रयत्न करावा, असे आवाहन राजनाथसिंह यांनी यावेळी केले.

Web Title: Don't intefere in state of affairs in UP : PM Modi asks BJP MPs