...तर तुमचाही कपिल शर्मा होईल - केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला तर, तुमतीही विनोदवीर कपिल शर्मासारखी स्थिती होईल, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

लाच प्रकरणाच्या ट्विटमुळे कपिल शर्माच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्याने बंगल्यामागील खारफुटीवर भराव टाकला असल्याचे सोमवारी मुंबई कांदळवन संधारण विभागाने केलेल्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे फौजदारी कारवाई होऊन त्याला तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्‍यता आहे. त्याच्या शेजाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनेसे) त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी केजरीवाल यांनी ट्विट करत पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. केजरीवाल म्हणाले की, मोदींच्या काळात कोणीही भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस करू नये. नाहीतर त्यांचे हाल कपिल शर्मासारखे करण्यात येतील.

Web Title: Don't raise your voice; else face it like Kapil Sharma, says Kejriwal