आमच्याविरोधातील प्रचार चुकीचाच: मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. माझ्याविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट झाले. आमच्याविरोधात जो अपप्रचार करण्यात आला होता, त्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे.

नवी दिल्ली - 2 जी स्पेक्ट्रम प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून सर्वकाही स्पष्ट झाले आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे.

केंद्रात डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार असताना टूजी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. स्पेक्ट्रम लिलावात 1 लाख 76 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, खासदार कनिमोळी यांच्यासह 17 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 

याविषयी बोलताना मनमोहनसिंग म्हणाले, की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. माझ्याविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट झाले. आमच्याविरोधात जो अपप्रचार करण्यात आला होता, त्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे.

Web Title: Dont Want To Boast Massive Propaganda Unfounded Manmohan Singh After 2G Verdict