गोवा : हडफडे येथे दुहेरी खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

बार्देश तालुक्यातील हडफडे येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घरामध्ये दुहेरी खून झाला. वृद्ध मालकीण व कामगाराने एकमेकावर केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

गोवा : बार्देश तालुक्यातील हडफडे येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घरामध्ये दुहेरी खून झाला. वृद्ध मालकीण व कामगाराने एकमेकावर केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

एकमेकांनी केलेल्या हल्ल्याबाबतचे कारण पोलिसांना उघड झालेले नाही. कामगाराने मालकिणीचा खून केल्यानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत घरातून बाहेर पडला व रस्त्यावरून धावत जाताना तो वाटेतच पडला व जागीच त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती म्हापशाचे पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double murder in Hadphade Goa

टॅग्स