
Vikas Yadav Marries 30-Year-Old Harshika Yadav While on Bail
Esakal
माजी खासदाराच्या ५२ वर्षीय पुत्राने ३० वर्षीय तरुणीशी लग्न केलंय. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उत्तर प्रदेशातील बाहुबली नेता अशी ओळख असलेले माजी खासदार डीपी यादव यांचा मुलगा विकास यादव यांचं लग्न झालं. ३० वर्षीय हर्षिका यादव हिच्याशी गाझियाबाधमध्ये आर्य समाजाच्या परंपरेनुसार ते लग्नबंधनात अडकले. हर्षिका शिकोहाबादची असून तिचे वडील सरकारी शिक्षक आहेत. तर हर्षिकाचं शिक्षण बीएससी, बीटीसी आणि एमएस्सी झालंय.