Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

Govinda Komkar Murder Case : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच टोळीयुद्धातून १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. गोविंदा कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणी अटकेत असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा होता.
Govinda Komkar Case: Gang Rivalry Claims 19-Year-Old in Pune

Govinda Komkar Case: Gang Rivalry Claims 19-Year-Old in Pune

Esakal

Updated on

गणेशोत्सवानिमित्त पुण्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही नाना पेठेत घडलेल्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच टोळीयुद्धातून १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवारी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रूट मार्च काढल्यानंतर २ तासातच ही घटना घडली. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्या झालेला तरुण गोविंदा कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणी अटकेत असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com