Dr. Anandibai Joshi : त्या दिवशी आनंदीबाई जोशींनी ठरवलं आपण डॉक्टरच व्हायचं

जर मी डॉक्टर झाले तर ते नाव डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशीच असेल असं म्हणत नाकारलेला ख्रिस्ती धर्म!
Dr. Anandibai Joshi
Dr. Anandibai Joshiesakal

Dr. Anandibai Joshi : आपला भारत देश पुरुषप्रधान आहे, आजही स्त्री आपल्या अधिकारांसाठी लढते आहेच, अशातही स्वतःच्या जिद्दीने संपूर्ण समाजाच्या अन् वेळ पडली घरच्यांच्याही विरोधात जावून आपले कर्तूत्व सिद्ध करणाऱ्या स्त्रिया कमी नाहीत. या भारतीय स्त्रियांनी विलक्षण असे कार्य करून देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. त्याच स्त्रियांपैकी एक म्हणजे – डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी!

आनंदीबाई अर्थात भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. नऊवारी नेसलेल्या एका मराठमोळी स्त्रीने १८८६ च्या काळात थेट अमेरिकेमधून डॉक्टरकीची पदवी मिळवलेली अन् रचला गेला भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा इतिहास.

Dr. Anandibai Joshi
Lalita Pawar Death Anniversary : कजाग खलनायिकी भूमिकेमागे दडलेली मायाळू आई

सनातनी ब्राम्हण कुटुंबात झाला जन्म :

आनंदीबाईंचा जन्म सनातनी ब्राम्हण कुटुंबात झाला. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे गोपाळरावांशी लग्न झाले. गोपाळराव हे बिजवर होते आणि वयाने आनंदीबाईंपेक्षा तिप्पट मोठेही. त्यांचे विचार हे उदारमतवादी होते. त्यांनी नेहमी आपल्या पत्नीच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिचा विश्वास वाढवला. त्यांनी नेहमी आनंदीबाईना प्रेरणा दिली.

Dr. Anandibai Joshi
Kasturba Gandhi Death Anniversary : अन् नेहरुंनी पुण्यात सुरु केली भारताची पहिली अँटिबायोटिक्स कंपनी

लग्नासाठी अट हुंडा नव्हे तर शिक्षण होती :

त्यावेळी स्त्रियांचे शिक्षण कुणीही गंभीरपणे घेत नसे पण गोपाळराव त्यामधील नव्हते. त्यांनी आनंदीबाईंशी एका अटीवर लग्न केले होते की, मुलीने शिक्षण घेण्यास तयार असावे, तसेच किमान तिने लिहिता वाचता येईल एवढे तरी शिकावे.

Dr. Anandibai Joshi
RR Patil Death Anniversary : राजिनामा दिलेल्या आर.आर.आबांना भेटायला विलासराव देशमुख गेले अन् चकीतच झाले!  

गोपाळरावांनी आनंदीबाईंना मराठी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांचे शिक्षण दिले. आनंदीच्या आई–वडिलांनी तिच्या शिक्षणामध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून गोपाळरावांचा कटाक्ष होता, गोपाळराव आनंदीच्या शिक्षणासाठी नेहमी आग्रही असायचे. एकेदिवशी त्यांनी आनंदीबाईना स्वयंपाकघरात त्यांच्या आजीची मदत करताना पहिले, अभ्यास न करता स्वयंपाक करण्यात वेळ वाया घालवताना बघून गोपाळरावांना राग आला आणि त्यांनी आनंदीबाईना बांबूच्या काठीने मारले..

Dr. Anandibai Joshi
Madhu Limaye Death Anniversary : मुंबईत पराभूत झालेला मराठी माणूस बिहारमध्ये चारवेळा विजयी झाला!

अन् सुरू झाला डॉवास होण्याचा प्रवास :

वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाई गरोदर राहिल्या होत्या पण प्रसूतीच्या वेळी स्त्रियांना डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलता येत नव्हते अन् यात अनेक स्त्रिया स्वतःचे अथवा बाळाचे प्राण गमवत, आनंदीबाईंनीही आपला पहिला मुलगा गमावला, मूल जन्मतःच आजारी होते पण त्यांना ते कळलंच नाही, आनंदीबाईंच्या जीवाला ही गोष्ट फार लागली, त्यांनी ठरवलं मला डॉक्टर व्हायचं आहे. गोपाळरावांनी सुद्धा आपल्या बायकोला शिकवण्याचे ध्येय मनाशी बाळगले आणि तिच्या मागे खंबीरपणे उभे राहून तिचे प्रत्येक पाऊलावर समर्थन केले.

Dr. Anandibai Joshi
Nikola Tesla Death Anniversary : चंद्रावरील एक खड्डा अन् ग्रहाला नाव देण्यात आलेले निकोला टेस्ला कोण होते?

ख्रिस्ती धर्म नाकारला :

आनंदीबाई शिकता आहेत हे त्यांच्या घरातल्यांपासून कोणालाच पटत नव्हतं, समाजाने आनंदीबाईंना अडवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, त्यांना धमकावले पण गोपाळराव हट्टी होते, त्यांनी जिद्दीने आनंदीबाईंना शिकवण्याचे मनी धरले होते. गोपाळरावांचे ठरले, आपण धर्मांतर करायचे पण आनंदीबाईनी याला ठाम नकार दिला, 'जर मी डॉक्टर झाले तर ते नाव डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशीच असेल' असं म्हणत त्यांनी ख्रिस्ती धर्म नाकारला.

Dr. Anandibai Joshi
Lokshahir Patthe Bapurao Death Anniversary : जेव्हा शाहुमहाराजांनी सोन्याची सलकढी पठ्ठे बापूरावांच्या हातात घातली!

आनंदीबाई कोल्हापूरच्या मिशनरी स्कूलमध्ये नंतर कलकत्याच्या शाळेत शिक्षण घेत होत्या खऱ्या पण डॉक्टर होण्यासाठी त्यांना अमेरिकेत जाणे भाग होते. १८८० मध्ये गोपाळरावांनी प्रसिद्ध अमेरिकन मिशनरी रॉयल विल्डर यांना पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी आपल्या पत्नीची अमेरिकन औषधांचा अभ्यास करण्याची इच्छा आहे तर तिला काही मदत मिळू शकते का असे? असे विचारले होते.

Dr. Anandibai Joshi
Gadgebaba Death Anniversary : गाडगेबाबांच्या भेटीनंतर खुद्द बाबासाहेबांच्या डोळ्यांत उभे राहिले अश्रू

रॉयल विल्डरने आनंदीबाईंना मदत मिळावी म्हणून ही बातमी एका लेखाद्वारे स्थानिक वर्तमानपत्रात छापली. त्याच दरम्यान न्यू जर्सीतील एक श्रीमंत अमेरिकन थिऑडीसिया कारपेंटर याने हा लेख वाचला आणि ती आनंदीबाईंची औषधांविषयी शिकण्याची असणारी डोंगराएवढी कळकळ बघून त्यांनी आनंदीबाईंना मदत करण्याचे ठरवले.

Dr. Anandibai Joshi
Gadgebaba Death Anniversary : माझा कोणीही शिष्य नाही म्हणणारे गाडगेबाबा या संताना मानायचे आपला गुरु

१९ वर्षाच्या आनंदीबाईंनी पेनीसिल्व्हेनियातील महिला वैद्यकीय महाविद्यालयात (सध्या ड्रेक्सेल विद्यापीठ, वैद्यकीय विद्यालय म्हणून ओळखले जाते) प्रवेश घेतला. शिक्षण घेताना आनंदीबाईंचे आरोग्य नेहमी बिघडायचे. पण त्यावर मात करत १८८६ मध्ये त्यांनी एम.डी.ची पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर खुद्द राणी विक्टोरियांनी अभिनंदनाचा संदेश आनंदीबाईंना पाठवला. प्राचीन हिंदू स्त्रियांच्या प्रसूतीकरणावर अभ्यास करून आनंदीबाईंनी आपला प्रबंध पूर्ण केला.

Dr. Anandibai Joshi
Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आदित्य ठाकरेंनी दिले वचन, म्हणाले...

पण दुर्दैव असं की, २६ फेब्रुवारी १८८७ रोजी,वयाची २२ वर्ष पूर्ण होण्यास महिन्याभरच कालावधी उरला असतांना त्यांचे निधन झाले. आनंदीबाईंना आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करताच आली नाही. आनंदीबाईंच्या अस्थी अमेरिकेत त्यांचा पाहुणचार करणाऱ्या मिसेस कारपेंटर यांना पाठवण्यात आल्या. त्यांनी त्या न्यूयॉर्क जवळील दफनभूमी मध्ये ठेवल्या आहेत.

Dr. Anandibai Joshi
Mahatma Phule Death Anniversary: महात्मा फुले यांच्या आयुष्यातील महत्त्वपुर्ण घटना...

अगदी खडतर परिस्थितीवर मात करीत पतीच्या मार्गदर्शनाने आणि साथीने आनंदीबाईंनी भारताची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. त्यांच्या लहानग्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य म्हणजे प्रत्येक भारतीय स्त्री साठी आदर्श आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com