प्रख्यात संस्कृत अभ्यासक डॉ. रमाकांत शुक्ला यांचं रेल्वे प्रवासादरम्यान निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanskrit Scholar Ramakant Shukla

प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक डॉ. रमाकांत शुक्ला यांचं आज निधन झालं.

प्रख्यात संस्कृत अभ्यासक डॉ. रमाकांत शुक्ला यांचं रेल्वे प्रवासादरम्यान निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक डॉ. रमाकांत शुक्ला (Dr. Ramakant Shukla) यांचं आज (बुधवार) निधन झालं. ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रमाकांत यांची प्रकृती खालावल्यानं ट्रेन अलिगड स्थानकावर थांबवण्यात आली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 2015 मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं होतं.

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. रमाकांत शुक्ला हे 82 वर्षांचे होते. रमाकांत यांच्या पश्चात पत्नी रमा शुक्ला यांच्याशिवाय तीन मुलं आहेत. या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक अलिगडला पोहोचले आहेत. दरम्यान, कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह आता दिल्लीत आणण्यात येत आहे. डॉ. रमाकांत हे केवळ संस्कृतचेच नव्हे, तर हिंदीचेही अभ्यासक होते.

हेही वाचा: परदेशात जाणाऱ्यांसाठी बुस्टर डोसबाबत सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय

दिल्ली विद्यापीठांतर्गत (Delhi University) राजधानी कॉलेजच्या हिंदी विभागाशी ते दीर्घकाळ निगडीत होते. 2005 मध्ये येथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी संस्कृत भाषेच्या संवर्धनाकडं लक्ष देण्यास सुरुवात केली. संस्कृत भाषेच्या उत्थानाशी संबंधित असलेल्या देववाणी परिषद या संस्थेचे ते संस्थापक होते. याशिवाय त्यांच्या देखरेखीखाली पंडित राज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Web Title: Dr Ramakant Shukla Renowned Sanskrit Scholar Is No More Died While Traveling In The Aligarh Train

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhiDelhi University
go to top