परदेशात जाणाऱ्यांसाठी बुस्टर डोसबाबत सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

सरकार लवकरच कोरोना लसीचा दुसरा आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करू शकतं; पण..

परदेशात जाणाऱ्यांसाठी बुस्टर डोसबाबत सरकारनं घेतला महत्वाचा निर्णय

Corona Vaccination : केंद्र सरकारनं (Central Government) परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी कोरोना लसीचा दुसरा डोस (Corona Second Dose) आणि बूस्टर डोसमधील (Corona Booster Dose) अंतर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांनी बुधवारी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिलीय. यानुसार परदेशात जाणारे प्रवासी दुसऱ्या डोसनंतर 90 दिवसांनी बूस्टर डोस घेऊ शकतील. गेल्या आठवड्यात लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटानं (NTAGI) सांगितलं की, 'परदेशात जाणाऱ्यांना प्रतिबंधात्मक डोस देण्याच्या विषयावर चर्चा करेल.'

शिक्षण, नोकरी, क्रीडा स्पर्धा आणि व्यवसायासाठी परदेशात जाणाऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस लागू करण्याची परवानगी द्यायची का? असा प्रश्न या गटानं विचारला होता. याशिवाय, सल्लागार गटानं असंही म्हटलं होतं की लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस घेण्यासाठी नऊ महिन्यांचं अंतर कमी करून प्रत्येकासाठी सहा महिने विचारमंथन करेल. मात्र, हा अंतिम निर्णय अद्याप आलेला नाहीय.

हेही वाचा: आमदारांच्या कुटुंबीयांची चौकशी करणाऱ्या IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की, सरकार लवकरच कोरोना लसीचा दुसरा आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करू शकतं. परंतु, यावर अंतिम निर्णय येणं बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच सध्याचे अंतर नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत कमी करू शकतं. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, लसीच्या दोन्ही डोससह प्रारंभिक लसीकरण केल्यानं सुमारे सहा महिन्यांनंतर प्रतिपिंडाची पातळी कमी होते आणि बूस्टर डोससह प्रतिकारशक्ती वाढते.

Web Title: Big Government Decision Regarding Second Dose Of Corona Vaccine And Booster Dose For Those Traveling Abroad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top