Rahul Gandhi Reaction : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप ; भाजप सरकावर मोठा आरोप, म्हणाले...

Dr Sampada Munde Suicide Case : जेव्हा सत्ताच गुन्हेगारांची ढाल बनत असेल तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून केली जावी? असाही सवाल राहुल गांधींनी केलाय.
Congress leader Rahul Gandhi expressing anger over Dr. Sampada Munde suicide case, accusing BJP government of negligence and injustice.

Congress leader Rahul Gandhi expressing anger over Dr. Sampada Munde suicide case, accusing BJP government of negligence and injustice.

esakal

Updated on

Rahul Gandhi Reaction on Dr Sampada Munde Suicide Case : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी सातारा जिह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. तसेच, यावरून त्यांनी भाजप सरकारवरही गंभीर आरोप केला आहे.

 डॉ. संपदा मुंडे यांनी २४ ऑक्टोबरला गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच, त्यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासेही केले आहेत. त्यात फलटण पोलीस ठाण्यातील पीएसआय गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने सतत मानसिक त्रास दिल्याचा थेट आरोप आहे.  या प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलंय? -

‘’महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात बलात्कार आणि छळाला वैतागल्यानंतर डॉ. संपदा मुंडे यांनी केलेली आत्महत्या, कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादवरणारी टाकणारीच घटना आहे. एक होतकरू डॉक्टर मुलगी, जी दुसऱ्यांचे दु:ख मिटवण्याची आकांक्षा बाळगत होती. भ्रष्ट सत्ता आणि प्रशासनातील अपराधींच्या छळाची शिकार बनली.’’

‘’ज्याला गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली होती, त्यानेच या निरागस मुलीविरोधात सर्वात घृणास्पद गुन्हा केला, तिचा बलात्कार आणि शोषण केले. रिपोर्ट्सनुसार भाजपशी निगडीत काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचाराचा दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला.’’

Congress leader Rahul Gandhi expressing anger over Dr. Sampada Munde suicide case, accusing BJP government of negligence and injustice.
Cyclone Monthha : चक्रीवादळ ‘मोंथा’ धडकणार! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा; लष्करी तुकड्याही 'अलर्ट मोड'वर

‘’सत्तेकडून संरक्षण होणाऱ्या गुन्हेगारी विचारधारेचे हे एक सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाहीतर संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ताच गुन्हेगारांची ढाल बनत असेल तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून केली जावी? डॉ. संपदाचा मृत्यू या भाजप सरकारचा अमानुष आणि संवेदनाहीन चेहरा उघड करत आहे.’’

याशिवाय ‘’आम्ही न्यायाच्या या लढाईत पीडित कुटुंबाच्या सोबत ताकदीने उभा आहोत. भारतातील प्रत्येक मुलीसाठी – आता भीती नाही, न्याय पाहीजे.’’ असं राहुल गांधींनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com