द्रौपदी मुर्मूंचा विरोध योग्य नाही; काँग्रेस नेत्याचा पक्षाला सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Draupadi Murmu Latest News

द्रौपदी मुर्मूंचा विरोध योग्य नाही; काँग्रेस नेत्याचा पक्षाला सल्ला

नवी दिल्ली : ‘पं. मोतीलाल नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेस नेहमीच शोषित, वंचित आणि आदिवासींच्या पाठीशी उभी राहिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (President Election) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या आदिवासी महिला उमेदवाराला विरोध करणे माझ्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. पक्षश्रेष्ठींनी याचा फेरविचार करावा’, असे ट्विट आचार्य प्रमोद कृष्णम यांनी करून काँग्रेसला (Congress) इतिहासाची आठवण करून दिली.

विरोधकांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले यशवंत सिन्हा यांचा पाठिंबा काढून घेण्याचे आवाहन काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्याने पक्षाला केले आहे. प्रमोद कृष्णम यांच्या ट्विटवर आतापर्यंत कोणत्याही काँग्रेस नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांना कठोर हल्ल्याला सामोरे जावे लागू शकते, असे मानले जात आहे. यापूर्वी कन्हैयालाल हत्याकांडातही त्यांनी राजस्थान पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपल्याच सरकारला घेरल्याने त्यांना काँग्रेस नेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे (President Election) गणित भाजप समर्थीत उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या बाजूने जात असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत भाजपचा मित्र पक्ष जेडीयू व्यतिरिक्त अकाली दल, तेलगू देसम पार्टी, जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआर काँग्रेस, मायावतींचा पक्ष बसपा, शिवसेना, बीजेडी या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या पक्षांमुळे द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्‍चित दिसत आहे. यशवंत सिन्हा यांची उमेदवारी ही औपचारिकता ठरत आहे.

Web Title: Draupadi Murmu President Election Congress Leader Advises Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..