esakal | DRDO विकसीत करतंय ड्रोनविरोधी स्वदेशी तंत्रज्ञान
sakal

बोलून बातमी शोधा

DRDO_Dnone

DRDO विकसीत करतंय ड्रोनविरोधी स्वदेशी तंत्रज्ञान

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : जम्मू येथील एअरफोर्सच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी ड्रोन हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. कारण, अशा प्रकारच्या ड्रोन हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे अद्याप पुरेशी यंत्रणा तयार नाही. पण हा हल्ला गांभीर्यानं घेत सरकारकडून याबाबत उपायोजनांवर भर दिला जात आहे. त्यानुसार, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (DRDO) ड्रोनविरोधी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. (DRDO developing indigenous counter drone technology Amit Shah aau85)

शहा म्हणाले, "लवकरच आपल्याला ड्रोन उपलब्ध होतील. यासाठी केंद्र सरकारनं यापूर्वीच सर्व संशोधन आणि विकास प्रकल्प मंजुर केले आहेत. आता आपल्यासमोर अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि स्फोटकं यांची गुप्त बोगद्यांमधून आणि ड्रोन्सच्या माध्यमातून होणारी तस्कारी ही महत्वाची आव्हानं आहेत.

दरम्यान, २३ जून रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अनेकदा भारतीय सैन्य दलांच्या ठिकाणांवर ड्रोन्स घिरट्या घालताना आढळून आली आहेत. या ड्रोन्सवर भारतीय लष्कराकडून आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस (BSF) यांच्याकडून फायरिंगही करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी चार ड्रोन सांबा आणि जम्मू परिसरातील विविध भागात आढळून आले होते. जम्मूतील एअरफोर्सच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा गार्डनं (NSG) इथे अँटीड्रोन सिस्टीम तैनात केली होती. तसेच हवाई दलाकडूनही अशा प्रकारे हल्ल्यांपासून प्रतिबंधांसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

जम्मूत झालेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये एअरफोर्सच्या कुठल्याही उपकरणाचं नुकसानं झालं नव्हतं. पण दोन अधिकारी किरकोळ जखमी झाले होते. यानंतर श्रीनगर, कुपवाडा, राजौरी आणि बारामुल्लामध्ये ड्रोन्सची साठवणूक, विक्री, स्वतःजवळ बाळगणे, त्यांचा वापर करणे आणि वाहतूक करणे तसेच इतर छोटी हवाई उपकरण बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा: Sakal News Impact: दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणार लेखनिक; परीक्षेपासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना

loading image